Goa Drug Case: ड्रग्ज माफिया अटालाच्या जामीन अर्जावर 10 जूनला सुनावणी; बेकायदा वास्तव्याप्रकरणी हणजूण पोलिस ठाण्यातही गुन्हा नोंद

Goa HC Defers Drug Mafia Atala’s Bail Hearing to June 10: कोकेन ड्रग्जप्रकरणी अटक केलेल्या ड्रग्ज माफिया यानिव बेनाहिन ऊर्फ अटाला याने जामिनासाठी केलेल्या अर्जावरील सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी बुधवारी (28 मे) उत्तर देण्यासाठी वेळ घेतल्याने त्यावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने १० जूनला ठेवली आहे.
Mumbai High Court Goa Bench
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कोकेन ड्रग्जप्रकरणी अटक केलेल्या ड्रग्ज माफिया यानिव बेनाहिन ऊर्फ अटाला याने जामिनासाठी केलेल्या अर्जावरील सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी बुधवारी (28 मे) उत्तर देण्यासाठी वेळ घेतल्याने त्यावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने १० जूनला ठेवली आहे. बेकादेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध हणजूण पोलिस स्थानकातही गुन्हा नोंद आहे.

पोलिस खात्याच्या अमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने संशयित यानिव ऊर्फ अटाला याला तो भाडेपट्टीवर राहत असलेल्या फ्लॅटवर छापा टाकून अटक केली होती. त्याच्या फ्लॅटची झडती घेतली असता कमर्शियल प्रमाणात कोकेन ड्रग्ज सापडला होता.

Mumbai High Court Goa Bench
Goa Drug Case: अमली पदार्थांसह अटक केलेल्या 'अटाला'ला कोर्टाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला

या छाप्यावेळी त्याच्याकडे गोव्यातील (Goa) बँक खात्याचे पासबुक तसेच आधार कार्ड सापडले होते. या आधार कार्डच्या साहाय्याने त्याने आंतरराज्य विमान प्रवास केला होता. त्यामुळे त्याच्या या आधार कार्डचा तपास पोलिस करत आहेत. त्याने जामिनासाठी सत्र न्यायालयात केलेला अर्ज फेटाळल्याने उच्च न्यायालयात अर्ज सादर केला आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com