वायनाड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुडक्कई, चुरलमला, अट्टमला व नूलपुझ्झा या चार गावांमध्ये गेल्या मंगळवारी ता. (३०) पहाटे दोन वाजता मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन चारही गावे ढिगाऱ्याखाली गाडली गेली Dainik Gomantak
गोवा

Wayanad Landslides: वायनाड मधील आपदग्रस्तांसाठी 'सकाळ रिलीफ फंडा' तर्फे २५ लाख रुपयांची मदत

Sakal Relief Fund: 'वायनाड' येथील आपदग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 'सकाळ रिलीफ फंडा' कडून समाजातील दानशूर व्यक्ती व विविध संस्थांना मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Kerala Wayanad Landslides

पुणे : केरळच्या वायनाड मधील आपदग्रस्तांच्या मदतीसाठी सकाळ माध्यम समूहातील 'सकाळ रिलीफ फंडा' तर्फे २५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून, महाराष्ट्रात व देशात नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी तातडीची मदत पाठविणे व प्रभावित घटकांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने १९४३ पासून 'सकाळ रिलीफ फंड' सामाजिक जाणिवेतून भरीव कार्य सातत्याने करत आहे. आपदग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा कायम ठेवत 'वायनाड' येथील आपदग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 'सकाळ रिलीफ फंडा' कडून समाजातील दानशूर व्यक्ती व विविध संस्थांना मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.

केरळच्या वायनाड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुडक्कई, चुरलमला, अट्टमला व नूलपुझ्झा या चार गावांमध्ये गेल्या मंगळवारी ता. (३०) पहाटे दोन वाजता मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन चारही गावे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. भूस्खलनामुळे मृत्यमुखी पडलेल्यांची संख्या जवळपास २८१ वर पोचली आहे. तसेच १३० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असून अडीचशेहून अधिक नागरिक बेपत्ता आहेत.

यापूर्वीही 'सकाळ रिलीफ फंडा' ची केरळ साठी मदत ...

केरळ येथील एसएनडीपी शाळेचे बांधकाम पूर्ण :-

२०१८ साली केरळ मध्ये आलेल्या पुरामुळे आलाप्पुझा जिल्ह्यातील दुर्गम अशा कुट्टमंगलम भागातील श्री नारायण धर्म परिपालनायोगम (एसएनडीपी) या १०० वर्ष जुन्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रचंड नुकसान झाले होते. या शाळेसाठी नवीन इमारत बांधकामासाठी 'सकाळ रिलीफ फंड' अंतर्गत जमा झालेल्या केरळ पूरग्रस्त निधीतून १ कोटी ३० लाख रुपयांची मदत करण्यात आली होती. आज त्याठिकाणी सर्व सोयी-सुविधांयुक्त दोन मजली शाळेची सुसज्ज इमारत निर्माण झाली आहे.

कुट्टमंगलम, आलाप्पुझा, केरळ :- २०१८ साली केरळ मध्ये आलेल्या पुरामुळे श्री नारायण धर्म परिपालनायोगम (एसएनडीपी) या उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रचंड नुकसान झाले होते. 'सकाळ रिलीफ फंडा' अंतर्गत पूरग्रस्त निधीतून करण्यात आलेल्या मदतीमुळे सर्व सोयी-सुविधांयुक्त बांधण्यात आलेली दोन मजली शाळेची सुसज्ज इमारत.

मदतीचे आवाहन

केरळच्या वायनाड जिल्ह्यातील प्रभावित चार गावांमधील आपदग्रस्तांच्या मदतीसाठी व पुर्नवसनासाठी समाजाला 'सकाळ रिलीफ फंड' कडून मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.

मदत करण्यासाठी:-

१. सकाळ रिलीफ फंड

HDFC Bank

A/C No : 57500000427822

IFSC : HDFC0000103

Branch - FC Road , Pune.

या खात्यावर देणगीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने बँक ट्रान्स्फर करून देणगी देऊ शकता.

२. https://sakalrelieffund.com या संकेतस्थळावर जाऊन डोनेट नाऊ वर क्लिक करून आपली देणगीची रक्कम डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड व बँक ट्रान्सफर मार्फत पाठवू शकता.

३. मदतीचे धनादेश सकाळ रिलीफ फंड या नावाने दैनिक 'सकाळ' च्या सर्व आवृतीनिहाय कार्यालयात (रविवार वगळून) ११ ते ५ या वेळेत स्वीकारले जातील.

'सकाळ रिलीफ फंड' साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमांतर्गत प्राप्तिकर सवलतीस पात्र आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क :- ८६०५०१७३६६

नैसर्गिक आपत्ती आणि लोकसहभागाच्या मदतीने 'सकाळ रिलीफ फंड' चे कार्य :-

१. १९६१ साली पानशेत धरण दुर्घटना :- १ लाख ५० हजार निधी जमा करून तातडीची मदत म्हणून दहा हजार लोकांना कपडे वाटप करण्यात आले.

२. १९७७ साली आंध्रप्रदेशातील चक्रीवादळ :- तातडीची वैद्यकीय मदत म्हणून दोन लाख रुपये किमतीची पन्नास हजार लोकांसाठी औषधे पाठविण्यात आली होती.

३. १९९३ मध्ये मराठवाड्यातील भूकंप दुर्घटना :- सहा हजार लोकांसाठी चार ठिकाणी मोफत जेवणाची सोय करण्यात आली होती. याशिवाय त्याभागात १ कोटी २८ लाख रुपयांचा निधी संकलित करून प्रभावित सात गावांमधील शाळांचे नूतनीकरण, इमारत बांधकाम व मुला-मुलींसाठी एका वसतिगृहाचे बांधकाम करण्यात आले.

४. १९९९ कारगिल युद्ध :- युद्धात जखमी होऊन अपंगत्व आलेल्या पाच हजार भारतीय सैनिकांना १ कोटी १० लाख रु किमतीचे शारीरिक हालचाल व्यवस्थित करणारे वैद्यकीय साहित्य व उपकरणे यांचे वाटप. याशिवाय सैनिकांच्या मुलींसाठी चार जिल्ह्यांमध्ये पुणे, कोल्हापूर, अमरावती व रत्नागिरी येथे २ कोटी ६० लाख रुपये खर्च करून वसतिगृहांची उभारणी करण्यात आली.

५. २००१ गुजरात भूकंप :- तातडीची मदत म्हणून १२ लाख रुपयांचा निधी जमा करून रक्त संकलन करण्यासाठी रुग्णवाहिका गुजरात राज्याला पाठविण्यात आली. याशिवाय ३ कोटी रुपये संकलित करून प्रभावित भागातील ७० शाळांचे नूतनीकरण, बांधकाम व एका वसतिगृहाची उभारणी करण्यात आली.

६. २०१४ माळीण दुर्घटना :- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव डोंगरकडा कोसळून गाडले गेले होते. माळीणसाठी जमा झालेल्या देणगीतून माळीण व आंबेगाव तालुका परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी १ कोटी २५ लाख रुपये संकलित करून एका वसतिगृहाची उभारणी करण्यात आली आहे. आजमितीस माळीण परिसरातील एकशे पंचवीसहून अधिक विद्यार्थी वसतिगृहाचा लाभ घेत आहेत.

७. २०१९ कोल्हापूर - सांगली महापूर :- १ कोटी १८ लाख ८७ हजार रुपये संकलित करून तातडीची मदत म्हणून अन्नधान्य किट, कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप. याशिवाय कोल्हापूर- सांगली भागातील ३९ शाळांना इमारत दुरुस्ती, शैक्षणिक व भौतिक साहित्य खरेदी, वर्गखोल्या बांधकाम व शाळांच्या नूतनीकरणासाठी मदतीच्या सात टप्प्यात २ कोटी ४२ लाख २६ हजार रुपयांची मदत.

८. २०२३ इर्शाळवाडी दुर्घटना :- रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्त ३१ शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे शैक्षणिक शिष्यवृत्ती स्वरूपात मदत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT