Boat sink Dainik Gomantak
गोवा

Watch Video : केरळची बोट गोव्यात बुडाली, क्रू सदस्य थोडक्यात बचावले; घटनेचा थरारक व्हिडीओ पाहा

बोटीवरील कर्मचाऱ्यांची सुटका

Rajat Sawant

Goa : आग्वादपासून काही अंतरावर अरबी समुद्रात पर्यटकांना समुद्रसफर घडविणाऱ्या बोटीला रविवारी सायंकाळी जलसमाधी मिळाल्याची घटना घडली आहे. सध्या बोट बुडाल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाला आहे. या बोटीवरील कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे.

आग्वादपासून काही अंतरावर अरबी समुद्रात पर्यटकांना समुद्रसफर घडविणाऱ्या खासगी बोटीला रविवारी सायंकाळी अपघात झाला. या अपघातात बोटीला जलसमाधी मिळाली. या बोटीवरील कर्मचाऱ्यांनी किनाऱ्यावरील इतर खासगी बोट बोलावून बोटीवरील कर्मचाऱ्यांची सुटका केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बुडालेली बोट केरळमध्ये नोंदीत असल्याने बेकायदेशीरपणे ही बोट चालवित असल्याचे समोर आले आहे. संबंधित बोट मालकाचे सरकारात वरपर्यंत लागेबांधे असल्याने हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

बोटीची क्षमता 30 प्रवाशांची आहे. बोट पाण्यात गेली आणि बुडाली तेव्हा त्यात फक्त 6 क्रू सदस्य होते. याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बोट एक महिन्यापूर्वी गोव्यात आली होती आणि त्या बोटीची चाचणी सुरू होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: शिवोलीत 8.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

SCROLL FOR NEXT