Electrocution Death  Dainik Gomantak
गोवा

Electrocution At Miramar: वीज अंगावर पडून मिरामार येथे केरळच्या व्यक्तीचा मृत्यू; सुदैवाने पत्नी, मुले बचावली

Electrocution At Miramar: माघारी परतणाऱ्या अखिल आणि त्यांच्या सोबतच्या लोकांसमोरच वीज कोसळली.

Pramod Yadav

Electrocution At Miramar Beach

पणजीतील प्रसिद्ध मिरामार समुद्रकिनाऱ्यावरुन परतताना केरळच्या व्यक्तीचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला आहे. सुदैवाने त्यांची पत्नी आणि मुले यातून बचावली आहेत.

सात चे आठ जणांचा ग्रुप मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास मिरामार बीचवर असताना ही घटना घडली. याचवेळी पावसाला देखील सुरुवात झाली होती.

अखिल विजयन (35, रा. केरळ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अखिल त्यांची पत्नी मुलांसह मंगळवारी मिरामार समुद्रकिनारी गेले होते, त्यांच्यासोबत काही मित्र देखील होते. रात्री नऊच्या सुमारास हलक्या पावसाला सुरुवात झाल्याने त्यांनी माघारी परतण्यास सुरुवात केली. माघारी परतणाऱ्या अखिल आणि त्यांच्या सोबतच्या लोकांसमोरच वीज कोसळली.

यात अखिल अत्यवस्थ झाले आणि कोसळले, इतरांचे देखील शुद्ध हरपली मात्र थोड्या वेळात बाळीचे शुद्धीवर आले पण, अखिल शुद्धीवर आले नाहीत.

अखिल यांना उपचारासाठी त्यांनी बांबोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्यांना मृत घोषित करण्यात आले. अखिल यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले त्यावेळी त्यांचा वीजेच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले.

शवविच्छेदनानंतर अखिल यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्यांच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT