Death Due To Fasting: निर्जळी उपवास बेतला जीवावर, फोंड्यात बिहारच्या युवतीचा मृत्यू

Death Due To Fasting: मडगावात काही दिवसांपूर्वी उपासमारीमुळे दोघा भावांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर आता फोंड्यातून एक घटना समोर आली आहे.
Death
Death Dainik Gomantak

Death Due To Fasting

निर्जळी उपवास करणे एका युवतीच्या जीवावर बेतले आहे. कुर्टी - फोंडा येथे राहणाऱ्या मूळ बिहारच्या अठरा वर्षीय खुशी कुमारचा कडक उपवासामुळे मृत्यू झाला आहे. खुशी आठवड्यातील चार दिवस उपवास करत होती.

दरम्यान, मंगळवारी रात्री छातीत दुखू लागल्याने तिला दवाखाण्यात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

खुशी कुमार मूळ बिहारची असून गेल्या चार वर्षापासून ती तिच्या फोंड्यातील काकाच्या घरी राहत होती. पोलिस चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, खुशी गेल्या काही दिवासांपासून आठवड्यातील चार दिवस (सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार) निर्जळी उपवास करत होती. उपवास काळात ती पाण्याचा एकही थेंब घेत नव्हती.

मंगळवारी छातीत दुखू लागल्याने तिला रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान, तिचा मृत्यू झाला.

Death
Fighter Jet Attack Simulation: गोव्यात UFO? मध्‍यरात्री कानठळ्या, हृदयात धडकी भरवणाऱ्या आवाजचे रहस्य काय?

पोलिस चौकशीत निर्जळी उपवासामुळे खुशीच्या पोटात पाण्याचा एकही थेंब नसल्याचे समोर आले. खुशी कुमार कोणत्या कारणासाठी उपवास करत होती, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

मडगावात दोन भावांचा उपासमारीमुळे झाला होता मृत्यू

मडगावात दोन भावांचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. तपासात त्यांच्या घरात अन्नाचा एकही कण आढळून आला नव्हता. याच घरात त्यांची आई देखील अत्यवस्थ अवस्थेत आढळून आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com