kerala College Goa trip 
गोवा

प्राचार्य तुम्ही पण? गोव्यात ट्रीप करुन केरळला परतणाऱ्या विद्यार्थी, शिक्षकाच्या बॅगेत दारुच्या बाटल्या

तपासणीत अबकारी खात्याला गाडीत पन्नास दारूच्या बाटल्या आढळून आल्या.

Pramod Yadav

kerala College Goa trip: कोट्टियाममधील एका महाविद्यालयाचे प्राचार्य अडचणीत सापडले आहेत. महाविद्यालयाची गोव्याला ट्रीप आयोजित करण्यात आली होती. ट्रीप करुन कोट्टियाम येथे परतत असताना ट्रीपची गाडी पोलिसांकडून तपासण्यात आली.

यावेळी पोलिसांना विद्यार्थी, बस चालक याच्यासह प्राचार्य यांच्या देखील बॅगमध्ये मद्याच्या बाटल्या सापडल्या आहेत. शुक्रवारी (दि.22) सकाळी अबकारी खात्याने ही कारवाई केली.

कोची येथील एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, कोट्टियाममधील एका महाविद्यालयाचे काही विद्यार्थी अलिकडे गोव्यात ट्रीपसाठी आले होते. गोव्यात मौजमजा केल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांची व्हॅन माघारी परतत होती. दरम्यान, कोची येथे अबकारी खात्याने त्यांची गाडी तपासणीसाठी थांबवली.

तपासणीत अबकारी खात्याला गाडीत पन्नास दारूच्या बाटल्या आढळून आल्या.

पथकाने केलेल्या तपासणीत विद्यार्थी, बस चालक एवढेच नव्हे तर शाळेच्या प्राचार्यांच्या बॅगेत देखील दारुच्या बाटल्या आढळून आल्या. यावेळी ३१.०८ लिटर दरु जप्त करण्यात आली. अबकारी खात्याने महाविद्यालयाचे प्राचार्य आणि चार जणांविरोधात मद्य तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

गाडीत ३३ मुली, सहा मुले, बस चालक, क्लिनर, प्राचार्य आणि इतर काहीजण होते. पोलिसांपासून बचावासाठी त्यांनी लगेच कप्प्यात मद्याच्या बाटल्या ठेवल्या होत्या.

एर्नाकुलम अबकारी विशेष पथक सीआयएम सजीवकुमार यांना शुक्रवारी सकाळी अबकारी तिरुवनंतपुरम मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात याबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem: सांगेत समस्यांचा पाऊस! मार्केट, स्टॅन्ड परिसरात असुविधा; वाचा Ground Report

Kadamba Smart Pass: रांगेत उभं राहण्याची झंझट संपली, कदंब प्रवाशांसाठी स्मार्ट ट्रान्झिट पास व कार्डची सोय; पासधारकांना 50% सवलत

Goa Rice Farming: गोव्यात तांदूळ उत्पादन वाढले! आधुनिक पद्धतीने भातशेती करण्यावर भर; उत्पादन क्षेत्रात मात्र घट

Goa Coconut Price: नारळ महागला! स्थानिक उत्पादन कमी, परराज्यातून आवक; शेतकऱ्यांकडून सर्वेक्षणाची मागणी

Goa Crime: गूढ उकलले! कुंकळ्ळीच्या बेपत्ता मुली नाशिकमध्ये सापडल्या; नेमकं काय घडलं वाचा

SCROLL FOR NEXT