Court Canva
गोवा

Goa Crime: दुबई मार्गे गोव्यात आला, बॅगेत सापडले ड्रग्ज; संशयित केनियन, नायजेरियन नागरिकांचा जामीनअर्ज फेटाळला

Goa Drugs Case: अमलीपदार्थ प्रकरणी अटकेत असलेले केनियन नायजेरियन नागरिक या दोघांचे जामीन अर्ज दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांच्या न्यायालयाने फेटाळून लावले.

Sameer Panditrao

मडगाव: अमलीपदार्थ प्रकरणी अटकेत असलेले केनियन नागरिक सॅम्युएल ओचिएंग कॅलारा व नायजेरियन नागरिक जेम्स एबुबे चुक्वू या दोघांचे जामीन अर्ज दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांच्या न्यायालयाने फेटाळून लावले.

तपासात संशयितांवरील आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आहे हे सिद्ध झाले आहे. त्यांना जामीन मिळाल्यास त्यांच्याकडून पुन्हा असाच गुन्हाही होऊ शकतो, असे निरीक्षण नोंदविताना जामीन अर्ज नामंजूर केला जात असल्याचा निवाडा न्यायालयाने दिला.

अमलीपदार्थ नियंत्रण खात्याच्या गोवा विभागाकडून २०२३ साली संशयितांवर कारवाई करून त्यांना अटक केली होती. सॅम्युएल कॅलारा हा दक्षिण आफ्रिकेतून दुबई मार्गे गोव्यातील दाबोळी विमानतळावर आलेला होता.

यावेळी त्याच्या बॅगेत अमलीपदार्थ आढळलेले होते. त्याशिवाय संशयित चुक्वू हा समाजमाध्यमांचा वापर करून अमली पदार्थांची विक्री करत असल्याचे आढळून आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISI च्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT