Taxi
Taxi Dainik Gomantak
गोवा

‘गोंयचो आवाज’चे आवाहन; केजरीवालांनी टॅक्सीचालकांना फसवू नये!

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यातील टॅक्सी चालकांनी आम आदमी पक्षाच्या खोट्या आश्वासनांना आणि फसव्या गोष्टींना फसू नये, असे आवाहन गोंयचो आवाजने केले आहे.

गोंयचो आवाजचे राज्य संयोजक कॅप्टन विरिएतो फर्नांडिस म्हणाले, कदाचित केजरीवाल (Arvind Kejriwal) हे विसरले असावेत, की त्यांच्या सरकारने 2015 मध्ये दिल्लीत ''सिटी टॅक्सी योजने''चा भाग म्हणून, टॅक्सी (Taxi) मीटर अनिवार्य करण्याचा कायदा लागू केला होता. केजरीवाल गोव्यात टॅक्सी मीटर नाकारण्याचे आश्वासन टॅक्सी चालकांना देत आहेत? गोव्यातील टॅक्सी चालकांनी केजरीवाल यांच्या जुमल्यांना बळी न पडता, त्यांच्या कृतींचा बारकाईने अभ्यास करावा.

गोंयचो आवाजचे अध्यक्ष स्वप्नेश शेर्लेकर म्हणाले, दिल्ली सरकार प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याने अनेक मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे आणि सर्वसामान्यांनाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले आहेत. खरं तर केजरीवाल सरकारची असक्षमता व स्वार्थापुढे सार्वजनिक हित ठेवण्याची त्यांना इच्छा नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने औद्योगिक, बांधकाम मोडतोड इत्यादींवर लगाम घालण्यासाठी यापूर्वी पावले का उचलली नाहीत.

अरविंद केजरीवाल यांचे गोव्यात वारंवार होणारे दौरे कदाचित त्यांना दिल्लीतील प्रदूषणापासून दूर राहण्याच्या आवश्यकतेने प्रेरित असू शकतात. आप च्या (Aam Aadmi Party) चुकांची यादी पाहता ''आप''ला गोवा समजला नसल्याचे दिसून येते. मतदारांना वेठीस धरण्याची केजरीवाल यांची रणनीती ही ''आप''ची आणखी एक चाल आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT