डिचोलीत पावसाने धरला जोर!

शहरासह काहीठिकाणी वाहतूक कोंडीही झाली.
Rain
RainDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : पावसाचा (Rain) कहर चालूच असून, शनिवारी जोरदार पावसाने डिचोलीत सर्वत्र झोडपून काढले. आजच्या पावसावेळी मात्र विजेचा लखलखाट आणि मेघगर्जना झाली नसली, तरी सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. रात्री 8.30 वाजेपर्यंत पाऊस पडत होता. त्यानंतर मात्र पाऊस कमी झाला. पावसामुळे सर्वत्र नागरिकांची तारांबळ उडाली. शहरासह काहीठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. दरम्यान, पावसाच्या कहरामुळे शेतकरी मात्र अद्याप सावरलेले नाहीत.

शनिवारी दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली. सायंकाळी तर पावसाने जोर धरला. रात्रीपर्यंत पावसाची बरसात चालूच होती. जोरदार पावसामुळे आजही सर्वत्र पाणी साचले होते. पावसामुळे सायंकाळपर्यंत कोणतीही विपरीत घटना घडली नाही. एकही कॉल आला नसल्याची माहिती डिचोली अग्निशामक दलाकडून मिळाली आहे.

Rain
आमदारांच्या निर्णयाचे स्वागत पण ढवळीतील चौपदरी रस्ता पुन्हा बंद!

शेतकरी चिंतेत

पावसाच्या कहरातही डिचोलीतील बहूतेक सर्व भागात कापणी आणि मळणीची कामे एकदाची पूर्ण झाली आहे. मात्र भात वाळवायला आणि भाताचे वारे करायला मिळत नसल्यामुळे शेतकरी अस्वस्थ बनले आहेत. पावसाचा कहर असाच चालू राहिल्यास घरात आलेल्या भाताची वाताहात होऊन ते खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

विवाह सोहळ्यांवर पाणी

गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे सरसकट सर्वच कामांचा विचका झालेला असून त्यामुळे अनेकांची चांगलीच गैरसोयही झालेली आहे. काही भागात तर तुलसीविवाहानंतर ठरलेल्या विवाह सोहळ्यांवरही पावसाचे पाणी फिरलेले आढळून आले. सासष्टी तालुक्याच्या काही भागांत रस्त्याचे हाटमिक्स डांबरीकरण सुरु झाले होते ते रहीत ठेवले गेले. मलनिस्सारण वाहिन्यांच्या कामांचेही तसेच झाले.

मात्र खोदलेल्या रस्त्यांमुळे लोकांची गैरसोय झाली. एरवी नोव्हेंबर मध्ये सहसा पाऊस पडत नसतो आल्याच तर सरी येतात पण या दिवसांतील पाऊस जुलै आगस्ट मधील पावसाप्रमाणे पडल्याचे दिसून येते. या पावसामुळे सर्वाधिक हिरमोड झाला तो तुलसीविवाहानंतर ठरलेल्या विवाहांतील आयोजकांचा. कोविडमुळे लांबलेले अनेक विवाह तुलसीविवाहाच्या दुसऱ्या दिवसापासून सुरु झालेले होते. त्यांतील अनेक ठिकाणी केलेली सजावट पावसांत भिजली तर रोषणाई बंद करावी लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com