Kejriwal Ki Guarantee 1000 per month to every goan woman above age of 18 Twitter/ @ANI
गोवा

गोव्यातील 18 वर्षांवरील महिलेला मिळणार दरमहा 1000 रूपये

गोवा सरकारतर्फे महिलांसाठी राबविण्‍यात येणाऱ्या सामाजिक योजनांचे पैसे त्‍यांना वेळेवर मिळत नाहीत.

दैनिक गोमन्तक

नावेली: गोवा सरकारतर्फे (Goa Goverment) महिलांसाठी (Womens) राबविण्‍यात येणाऱ्या सामाजिक योजनांचे पैसे त्‍यांना वेळेवर मिळत नाहीत. याबाबत दिरंगाई करून सरकार एकाप्रकारे महिलांचा छळ करीत आहे, असा सनसनाटी आरोप आम आदमी पक्षाचे गोवा (AAP) संयोजक राहुल म्हांबरे यांनी काल गोवा सरकारवर केला.

केजरीवाल दोन दिवसांच्या गोवा भेटीवर आले असून आज त्यांनी नावेली येथे महिला मेळाव्याला संबोधित केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) महिलांना त्यांचा हक्क मिळवून देण्‍याबरोबरच त्यांना स्वावलंबी होण्यासाठीही सहकार्य करणार आहे. नावेलीत आज झालेल्या महिला मेळाव्‍यात त्यांनी महिलांसाठी चांगल्‍या योजनांची घोषणा केली. ‘आप’ने गोव्यातील महिलांसाठी अनेक योजना राबविण्याचा संकल्‍प केला आहे. त्याची विस्‍तृत माहिती केजरीवाल यांनी आजच्या सभेत दिली.

गोव्यातील महिलांसाठी अरविंद केजरीवालांची हमी

  • गृह आधार योजने अंतर्गत 2500 प्रति महिना महिलांना मिळणार

  • 18 वर्षांवरील प्रत्येक महिलेला दरमहा 1000 रु.

  • 5.5 लाखांहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

Viral Video: नवी कोरी थार काही दिवसांत बंद पडली; मालकाने गाढवं बांधून, ताशा वाजवत कार शोरुमला ओढत नेली, व्हिडिओ व्हायरल

IPL 2025: राजस्थानची 'रॉयल' रणनीती! मिनी लिलावापूर्वी घेतला मोठा निर्णय, 'या' अनुभवी खेळाडूला केलं प्रशिक्षक

Cooch Behar Trophy: ..गोव्याने पकड गमावली! 5 बाद 27 वरुन छत्तीसगडच्या 170 धावा; फलंदाजांची खराब सुरवात

Chess World Cup Goa: विश्वकरंडक बुद्धिबळात भारताची आशा आता अर्जुनवर, हरिकृष्णाचे आव्हान टायब्रेक फेरीतील पराभवाने संपले

SCROLL FOR NEXT