Kaushiki Chakraborty, Shantanu Moitra Dainik Gomantak
गोवा

Kaushiki Chakraborty in Goa: 'कौशिकी चक्रवर्ती' येणार गोव्यात! 'पंख'चे होणार सादरीकरण; गोमंतकीयांसाठी सोहळा

Kaushiki Chakraborty Goa Visit: कौशिकी चक्रवर्ती यांना आजपर्यंत आपण शास्त्रीय संगीत कलाकार म्हणून ओळखत आलो आहोत. वेगळ्या शैलीतील गाणे आपण गावे हे स्वप्नही त्यांनी पाहीले होते.

Sameer Panditrao

कौशिकी चक्रवर्ती यांना आजपर्यंत आपण शास्त्रीय संगीत कलाकार म्हणून ओळखत आलो आहोत. पण आपल्या शास्त्रीय संगीताची पार्श्वभूमी घेऊन, वेगळ्या शैलीतील गाणे आपण गावे हे स्वप्नही त्यांनी पाहीले होते.

बनारसला ‘सॉङ्गस ऑफ रिव्हर’ या मालिकेसाठी शंतनू मोईत्रा यांच्याबरोबर शूट करत असताना ‘पंख’ या अल्बम/मालिकेची कल्पना त्या दोघांना सुचली. शंतनू मोईत्रा या कल्पनेबद्दल एका ठिकाणी सांगतात, ‘ही एक उत्तम संकल्पना ठरू शकेल असे आम्हाला वाटले- एका गोष्टीतून दुसरी गोष्ट जन्मणे. आम्हाला वाटले की आम्ही अशी गाणी तयार करू शकू आणि त्यामागच्या कथाही सांगू शकू.’

त्यानंतर काही वर्षे उराशी बाळगून साकार झालेले ते स्वप्न म्हणजे त्यांचा ‘पंख’ कार्यक्रम... कौशिकी चक्रवर्ती आणि शंतनू मोईत्रा यांचा ‘पंख’ भारत दौर्‍यावर आहे. भारतात 10 वेगवेगळ्या ठिकाणी ‘पंख’ सादर होणार आहे आणि त्यापैकी एक ठिकाण आहे गोवा. गोव्यात, वास्को येथील रवींद्र भवनमध्ये, ५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता ‘पंख’ कार्यक्रमात कौशिकी गाणे सादर करणार आहेत.

संपूर्णपणे नव्या सुरावटींमधून संगीत दिग्दर्शक शंतन मोईत्रा यांनी ‘पंख’च्या रचना संगीतबद्ध केल्या आहेत. कौशिकींचा आतापर्यंतचा सांगीतिक प्रवास आणि त्या अनुषंगाने अनेक आठवणी ऐकत ह्या सर्व रचनांचा आस्वाद घेणे हा एक समृद्ध अनुभव असणार आहे.

एखाद्या लेखकाने आपले आत्मचरित्र लिहावे किंवा एखाद्या दिग्दर्शकाने आपल्या अनुभवांवर एखादा चित्रपट करावा अगदी तसाच कौशिकी चक्रवर्ती आपला प्रवास गाण्यातून उलगडून दाखवतात. शास्त्रीय संगीताबरोबरच इतर गायनप्रकारामध्येही तितकेच प्रभुत्व असलेल्या कौशिकी हे शिवधनुष्य अगदी लीलया पेलतात. असा प्रयोग आजपर्यंत कदाचित कुठल्या गायकाने केलेला नसेल.

ह्या कार्यक्रमात कौशिकींच्या गाण्याबरोबरच वाद्यवृंदाचा पण अप्रतिम सहभाग आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीताच्या सीमा ओलांडून मुक्त संचार करणाऱ्या ह्या सर्व रचना रसिकांना एक नवा दृष्टीकोन देतात. विशेष प्रकाशयोजना आणि दृक-श्राव्य चित्रफिती प्रेक्षकांना एका अनोख्या सफरीवर घेऊन जातात.

‘पंख’च्या देशव्यापी दौऱ्यातील पुणे, मुंबई, दिल्ली, वाराणसी, भोपाल इत्यादी ठिकाणच्या कार्यक्रमाने तरुण पिढी तसेच पारंपरिक श्रोत्यांची वाहवा मिळवली आहे. ह्या रचना संकेतस्थळांवर प्रसारित झाल्या आहेत पण त्या थेट ऐकताना अधिक प्रभावी अनुभूती देणाऱ्या असल्यामुळे ‘चुकवू नये’ असाच हा कार्यक्रम असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: '..आमचे पैसे परत मिळवून द्या'! Cash For Job प्रकरणी फसवणूक झालेल्यांचे CM सावंतांसमोर गाऱ्हाणे; Watch Video

Pooja Naik: 'देसाई, पार्सेकरांना पैसे दिल्‍याचे पुरावे माझ्‍या मोबाईलमध्‍ये'! पूजा नाईकचा दावा; Special Interview

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

SCROLL FOR NEXT