Mapusa Labour Death Dainik Gomantak
गोवा

Tragic Death: मातीखाली गाडली गेली स्वप्नं! खोर्लीत दुर्दैवी घटना; भिंत कोसळून बंगालच्या कामगाराचा मृत्यू

Mapusa Khorlim Labour Death: कासारवाडा–खोर्ली, म्हापसा येथे गटार पुनर्बांधणीसाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान आज सकाळी दुर्दैवी दुर्घटना घडली.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा : कासारवाडा–खोर्ली, म्हापसा येथे गटार पुनर्बांधणीसाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान सकाळी दुर्दैवी दुर्घटना घडली. खोदकाम चालू असताना एका घराची दगडी संरक्षक भिंत अचानक कोसळून खाली काम करणाऱ्या दोन मजुरांवर पडली. या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना म्हापसा पालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ मध्ये घडली. या दुर्घटनेत तोजाम्मेल हक ऊर्फ राजू (वय ३८, मूळ रहिवासी पश्चिम बंगाल) याचा मृत्यू झाला. तर विशाल सरू (वय २१, मूळ रहिवासी पश्चिम बंगाल) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर सध्या म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत.

मृत व जखमी दोन्ही मजूर कासारवाडा, म्हापसा परिसरात भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते. मिळालेल्या माहितीनुसार, कासारवाडा–खोर्ली परिसरात चतुरी गुप्ता यांच्या घराशेजारी गटार पुनर्बांधणीसाठी खोदकाम सुरू होते.

यावेळी घराची जुनी दगडी संरक्षक भिंत अचानक कोसळली आणि दोन्ही मजूर तिच्या ढिगाऱ्याखाली अडकले. सहकाऱ्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बाबलो परब करीत आहेत. कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत असून, पालिकेच्या बांधकामांमध्ये आवश्यक खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Unseasonal Rain: वाळपईत अवकाळीचा कडाका! अचानक आलेल्या पावसाच्या सरींनी नागरिकांची उडाली दाणादाण

Konkan Railway: कोकणवासियांसाठी गुड न्यूज! मुंबई ते मडगाव विशेष गाडी जाहीर; 'या' 23 स्थानकांवर असणार थांबा, पाहा वेळापत्रक

Rajasthan Royals Sale: IPL इतिहासातील सर्वात मोठी डील! 15 हजार कोटींना विकली गेली 'राजस्थान रॉयल्स'; कोण आहे नवा मालक?

Honda: सफर गोव्याची! सर्वांचे स्वागत करणारे, मोठ्या जंक्शनचे काम करणारे 'होंडा' गाव

Mangaladitya Rajyog 2026: सूर्य-मंगळाची युती, 2 एप्रिलपासून मंगलादित्य राजयोगाचा चमत्कार; 3 राशींवर होणार धनाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT