Bike accident Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कर्नाटकच्या तरुणांची गोव्यात मुजोरी; युवतीशी गैरवर्तन, दुचाकीला धडक, एक जखमी Watch Video

Sattari Goa Crime News: या सर्व प्रकारानंतर संशयित तरुणांनी घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिकांनी त्यांना अडवून जाब विचारला.

Pramod Yadav

सत्तरी: युवतीशी गैरवर्तन केले, दुचाकीला धडक देऊन एकाला जखमी केल्याप्रकरणी कर्नाटकच्या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे. संशयित चारजण घटनास्थळावरुन फरार होण्याच्या तयारीत असताना पर्ये येथील स्थानिकांनी त्यांना अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, कर्नाटकचे पर्यटक गोव्यात पर्यटनासाठी आले असता त्यांनी तरुणीशी गैरवर्तन केले. एवढेच नव्हे तर नियमांकडे दुर्लेक्ष करुन चारचाकी चालवत एका दुचाकी चालकाला धडक दिली, यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे.

या सर्व प्रकारानंतर संशयित तरुणांनी घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिकांनी त्यांना अडवून जाब विचारला.

स्थानिकांनी संशयितांना अडवून घडलेल्या प्रकराची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संशयितांना अटक केली, याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपास केला जात आहे.

यावेळी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT