Environmentalist Prof. Rajendra Kerkar Dainik Gomantak
गोवा

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

गोमन्तक डिजिटल टीम

कर्नाटक सरकारची काही केल्या ‘करनाटकी’ वृत्ती जात नसून म्हादईवर त्यांची वक्रदृष्टी कायम आहे. कर्नाटक पुन्हा म्हादई वळविण्याच्या प्रयत्न करत असून खानापूर नजीकच्या नेरसे गावी कर्नाटक निरावरी निगम लिमिटेटने पाईपलाईन घालण्याचा कामाला सुरवात करण्यात आली आहे. कळसा-भंडुरा प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची किंवा इतर केंद्रीय संस्थांची परवानणी घेतलेली नसताना हे काम सुरू असल्याचे पर्यावरणप्रेमी प्रा. राजेंद्र केरकर यांनी सांगितले.

केरकर म्हणाले, नेरसे येथून भीमगड अभयारण्य अवघे ५०० मीटर अंतरावरही नाही. त्यामुळे पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात अशा प्रकारे काम करणे कितपत योग्य आहे. कर्नाटकला केंद्रीय जल आयोगाकडून केवळ कळसा-भंडुरा प्रकल्पाला केवळ तांत्रिक परवानगी मिळाली आहे.कर्नाटक निरावरी निगम लिमिटेट वन्यजीव परवाना किंवा पर्यावरण परवाना मिळालेला नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या कामाला सुरूवात करता येत नसताना कर्नाटकी डाव दिसून येत असल्याचे केरकर यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवा आणि कर्नाटक यांच्यातील प्रदीर्घ वाद मिटला असून, त्यांना नदी वळवण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे म्हटले होते. हे आता खरे ठरल्यामुळेच राज्यातील भाजप सरकार म्हादईच्या रक्षणासाठी काहीच करत नाही, म्हादईपेक्षा आपले पद वाचवण्याची त्यांना जास्त चिंता आहे, असे आलेमाव म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT