Liquor Bottles Dainik Gomantak
गोवा

खळबळजनक! ‘गोवा विक्रीसाठी’च्या दारुच्या बाटल्या सापडल्या कर्नाटकात; अबकारी खात्याच्या कारवाईकडे लक्ष

Liquor Smuggling: कर्नाटकात अलिकडे तेथील अबकारी खात्याने टाकलेल्या छाप्यात ‘केवळ गोव्यात विक्रीसाठी’ असे नोंदवलेल्या दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गोव्यातून होणारी दारू तस्करी पूर्णतः बंद करा, असा आदेश दिल्यानंतर हे छापासत्र सुरू झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa-Marked Liquor Bottles Found in Karnataka Amid Smuggling Crackdown

पणजी: कर्नाटकात अलिकडे तेथील अबकारी खात्याने टाकलेल्या छाप्यात ‘केवळ गोव्यात विक्रीसाठी’ असे नोंदवलेल्या दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गोव्यातून होणारी दारू तस्करी पूर्णतः बंद करा, असा आदेश दिल्यानंतर हे छापासत्र सुरू झाले आहे. यामुळे असा दारू पुरवठा करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी कर्नाटकचे अबकारी खाते गोव्यात येऊ शकते.

यापूर्वी अमली पदार्थ पुरवठा प्रकरणी हैदराबादच्या पोलिसांनी गोव्यात येऊन काहींना पकडून नेले होते. आता कर्नाटकाचे अबकारी खातेही तशीच कारवाई करण्याची शक्यता आहे. २९ ऑक्टोबर रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गोव्यातून होणारी दारू तस्करी रोखण्यासाठी कठोर उपाय योजण्याचे निर्देश अबकारी खात्याला दिले. गोव्यातून कमी किमतीची दारू कर्नाटकात आणल्याने राज्याच्या उत्पादन शुल्क महसुलावर परिणाम होत आहे. ते टाळण्यासाठी कर्नाटकने उपाययोजना सुरू केली आहे.

काँग्रेसप्रणीत कर्नाटक सरकार पाच निवडणूक वचनांची अंमलबजावणी करत आहे, ज्यासाठी दरवर्षी सरासरी ५५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे महसूल वाढीचा सरकारवर ताण आहे. सिद्धरामय्या म्हणाले आहेत की, ‘२०२४-२५ या वर्षासाठी उत्पादन शुल्क कर संकलनाचे उद्दिष्ट ३८ हजार ५२५ कोटी रुपये आहे.

दरमहा घेणार आढावा

प्रत्येक महिन्यात आढावा बैठक घेण्याची घोषणा करताना, उद्दिष्ट साध्य करण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असेही कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे अबकारी खात्याने छापासत्राला सुरवात केली आहे. कर्नाटकात जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची सीमेवर कसून तपासणी करण्यात येत आहे. काही ठिकाणी साठवून ठेवलेली दारू सापडल्याने ती कुठून आणली ते तपासले जात आहे. त्यातून गोव्यातून ती दारू पुरवली जात असल्याची माहिती मिळाल्याने कर्नाटक अबकारी खात्याचे अधिकारी गोव्यात थडकण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT