Ponda Dainik Gomantak
गोवा

Ponda Crime News: कर्नाटकच्या 47 वर्षीय व्यक्तीची फोंड्यात आत्महत्या

पोलिसांनी घटनेची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

Pramod Yadav

Ponda Crime News: काझीवाडा-फोंडा येथील 47 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे. मूळचा कर्नाटक येथील रहिवाशी असलेल्या या व्यक्तीने रविवारी सायंकाळाच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला.

मिळालेल्या माहितीनुसार, महंमद रफीक रफीक अब्दुल कादर पठाण (वय 47 रा. काझीवाडा, मूळ गाव कर्नाटक) असे या इसमाचे नाव आहे.

स्थानिकांना झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

शवविच्छेदनासाठी मृतदेह बांबोळी येथील गोमेकॉत पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

दरम्यान, महंमद यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आली नाही. तरी महंमद हे मागील बऱ्याच काळापासून बेरोजगार होते. असे स्थानिक सांगतात.

याप्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक रश्मी भाईडकर करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Torlls UN: शोलेच्या ‘ठाकूर’सारखी युएनची अवस्था! इराणच्या नव्या मीम डिप्लोमेसीनं उडवली खळबळ; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

AI Human Control: 'एआय'वर हवा मानवी लगाम; तंत्रज्ञानाच्या वेगापेक्षा जागतिक नियंत्रणाची गरज

संपादकीय: फुटबॉलप्रेमींचा विश्वासघात

Lashkar-e-Taiba Commander Killed: दहशतवादाचा फणा ठेचला! लष्कर-ए-तैयबाचा कुख्यात कमांडर मूसा ठार, भारतीय जवानांची मोठी कारवाई

खरी कुजबुज: एका नावाने उडवली अनेकांची झोप

SCROLL FOR NEXT