'इंडिया टु ऑस्ट्रेलिया व्हाया गोवा', मोदींनी शेअर केलेला ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानाचा 'तो' किस्सा काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील समृद्ध सांस्कृतिक संबंधांविषयीचा एक ट्वीट थ्रेड शेअर केला आहे.
Mrs. Ebert family
Mrs. Ebert familyDainik gomantak
Published on
Updated on

PM Modi on Australian Prime Minister: ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिज मागील काही दिवसांपूर्वी दिर्घ भारत भेटीवर होते. यावेळी दोन्ही देशांमध्ये अनेक महत्वपूर्ण बाबींवर चर्चा आणि करार झाले.

शिक्षणाबाबत देखील दोन्ही देशात ठोस बदल करण्यात आला आहे. याचा दोन्ही देशातील नागरिकांना फायदा होणार आहे.

अल्बानिज यांनी भारतात पंतप्रधान मोदी यांच्या सोबत विविध ठिकाणांना भेट दिली. तसेच, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सुरू असेलल्या क्रिकेट सामन्याचा देखील आस्वाद घेतला.

(PM Modi Shares Anecdote Of Australian Minister's Goa Link)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील समृद्ध सांस्कृतिक संबंधांविषयीचा एक ट्वीट थ्रेड शेअर केला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिज यांच्या सन्मानार्थ ठेवलेल्या मेजवानीच्या वेळी, व्यापार आणि पर्यटन मंत्री डॉन फॅरेल यांनी हा किस्सा सांगितला.

पंतप्रधानाचे ट्वीट काय?

"माझे मित्र, पंतप्रधान @AlboMP यांच्या सन्मानार्थ दिलेल्या मेजवानीच्या वेळी, ऑस्ट्रेलियाचे व्यापार आणि पर्यटन मंत्री डॉन फॅरेल यांनी हा अतिशय रोचक किस्सा सांगितला होता.

ते जेव्हा इयत्ता पहिलीत होते, तेव्हा त्यांच्या शिक्षिका श्रीमती एबर्ट यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता, आपल्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचे श्रेय ते आपल्या या शिक्षिकेलाच देतात."

"श्रीमती एबर्ट, त्यांचे यजमान आणि त्यांची कन्या लिओनी 1950 च्या दशकात भारतातील गोव्यातून अॅडलेडमध्ये स्थलांतरित झाले. एबर्ट ऑस्ट्रेलियातील अॅडलेड इथल्या शाळेत शिकवू लागल्या. त्यांची कन्या लिओनी पुढे दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या शिक्षक संघटनेची अध्यक्षही झाली."

"भारत आणि ऑस्ट्रेलियातील समृद्ध आणि प्रदीर्घ अशा संबंधांविषयीचा हा किस्सा ऐकून मला फार आनंद झाला. तसेच कोणी जेव्हा आपल्या शिक्षकांविषयी इतक्या आत्मीयतेने बोलते, तेव्हा ते ही एक वेगळे समाधान देणारे असते." असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com