Karnataka Elections 2023 Gomantak Digital Team
गोवा

Karnataka Election 2023 : मतदानासाठी जाणाऱ्या कन्नड रहिवाशांत उत्साह

मुरगावमधून तब्बल १० हजारहून अधिक लोक कर्नाटकला रवाना

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : रविवारी कर्नाटक निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता मुरगाव तालुक्यासह राज्यातील इतर भागांतून हजारो लोक बस, खासगी वाहने आणि रेल्वेतून आपापल्या गावी निघाले आहेत. गोवा कन्नड महासंघाचे अध्यक्ष सिद्धण्णा मेती यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीवेळी भाजपने तळागाळात जाऊन प्रचार आणि प्रसार केला.

याअगोदर काँग्रेस पक्षाने कधीच एवढ्या मुळात जाऊन मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला नव्हता. सांकवाळचे माजी सरपंच शरण मेती म्हणाले की, कन्नड राहिवाशांमध्ये कर्नाटकच्या निवडणुकीमुळे जल्लोष आहे. मुरगावमधून तब्बल १० हजारहून अधिक लोक कर्नाटकला रवाना झाले असून कर्नाटकमधील स्थानिक राजकारण्यांनी त्यांच्यासाठी येण्या-जण्याची, राहण्याची सोय केली आहे.

गोव्यात स्थायिक झालेले कन्नड लोक कर्नाटकात मतदानासाठी एवढ्या दूर का जातात, असे विचारले असता मेती म्हणाले की, काही लोकांच्या घरची माणसे अजूनही कर्नाटकात राहतात. त्यांची मतदान यादीत नोंदणी आहे. आपला मालकी हक्क आणि गावपण कायम राहावे, यासाठी काही लोक अजूनही मतदान करण्यासाठी कर्नाटकात जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT