Sangolda Demolition Karnataka siddaramaiah Dainik Gomantak
गोवा

Sangolda Demolition: गोव्यातील कारवाईची कर्नाटकला काळजी; सिद्धरामय्यांनी केली सीएम सावंतांना विनंती

Sangolda Demolition: सांगोल्डा येथील कोमुनिदादच्या जागेवर उभारण्यात आलेली 22 बेकायदेशीर घरे अखेर जमीनदोस्त करण्यात आली.

Pramod Yadav

Sangolda Demolition

सांगोल्डा येथील कोमुनिदादच्या जागेवर उभारण्यात आलेली 22 बेकायदेशीर घरे अखेर जमीनदोस्त करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्तर कोमुनिदादच्या प्रशासकांनी शुक्रवारी आणि शनिवारी ही कारवाई केली.

कोमुनिदादच्या या कारवाईबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी चिंता व्यक्त केली असून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे बेघरांच्या पुनवर्सन करण्यासाठी विनंती केलीय.

सांगोल्डा येथील बेकायदा घरे प्रशासनाने शनिवारी जमीनदोस्त केली. ज्यांची घरे पाडली आहेत, त्यात बहुतांश कर्नाटकातील नागरिक आहेत.

त्यामुळे घरे पाडलेल्यांना दिलासा देण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या धावून आले आहेत. या लोकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी सिद्धरामय्या यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.

तसेच, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत अशाप्रकारे कारवाई करु नये, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

सांगोल्डा येथे करण्यात आलेल्या कारवाईचे कर्नाटकमध्ये तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. तेथील स्थानिक नेत्यांनी कारवाईचा जोरदार निषेध नोंदवला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी KSRTC बसेस पाठवून गोव्यात बेकायदेशीररीत्या घरे बांधून राहिलेल्या आणि बेकायदा कामांत गुंतलेल्यांना कर्नाटकात घेऊन जावे आणि तेथे त्यांचे पुनर्वसन करावे, अशा शब्दात रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी त्यांच्यावर टीका केली.परब यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना देखील या पोस्टमध्ये टॅग केले आहे.

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे आणि म्हादईच्या विषयावरून सिद्धरामय्या हे सतत आक्रमक राहिले आहेत. त्यामुळे त्यांची ही मागणी मुख्यमंत्री किती मनावर घेतात, हे पाहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT