Karnataka Bus Accident At Goa:  Dainik Gomantak
गोवा

Karnataka Bus Accident At Goa: चालकाला लागली डुलकी; कर्नाटकची बस आगशीत उलटली...

Karnataka Bus Accident At Goa: 10 प्रवासी जखमी

Akshay Nirmale

Bengaluru Goa Private Bus Accident At Goa: कर्नाटकच्या एका खासगी बसला आज, गुरूवारी 7 सप्टेंबर रोजी सकाळी गोव्यातील झुआरी पुलावर अपघात झाला.

बसचालकाला डुलकी लागल्याने ही बस उलटल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात बसमधील दहा प्रवासी जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारासाठी बांबोळी येथील गोमॅकॉ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस (केए 01 एजे 2462) कर्नाटकची असून ती बंगळूर हून गोव्याला येत होती. आगशी येथे हा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याचा दावा काही प्रवाशांनी केला आहे.

अचानक बस उलटल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. एकमेकांच्या मदतीने आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांनी बसमधून बाहेर पडायला प्रवाशांना मदत केली. अपघात झाला तेव्हा या रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT