National Games Goa 2023 
गोवा

National Games Goa 2023: महाराष्ट्राचा दुसरा पराभव, कर्नाटकला पुरुष सांघिक बॅडमिंटनमध्ये सुवर्ण

अंतिम लढतीत महाराष्ट्राला नमविले

किशोर पेटकर

National Games Goa 2023: कर्नाटकने 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमधील पुरुष सांघिक सुवर्णपदक जिंकताना महाराष्ट्राचा अंतिम लढतीत 3-1 फरकाने नमविले. सामना शुक्रवारी ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झाला.

महिलांपाठोपाठ महाराष्ट्राच्या पुरुष संघालाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

पुरुष अंतिम लढतीत कर्नाटकच्या एस. भार्गव याने हर्षील दाणी याला तासभर चाललेल्या चुरशीच्या लढतीत 18-21, 21-19, 21-15 असे नमवून कर्नाटकला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या एकेरीत रोहन गुरबानी याने पृथ्वी रॉय याची झुंज 48 मिनिटांत मोडून काढताना 23-21, 22-24, 21-14 असे नमवून महाराष्ट्राला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. दुहेरीत कर्नाटकच्या जोडीची सरशी झाली.

एच. व्ही. नितीन व के. साई प्रतीक जोडीने महाराष्ट्राच्या दीप रंभिया व अक्षण शेट्टी जोडीला 21-12, 21-14 असे नमवून कर्नाटकला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.अंतिम लढतीतील तिसऱ्या एकेरीत आयुष शेट्टी याने दर्शन पुजारी याला 21-16, 21-17 असे 36 मिनिटांत नमवून कर्नाटकच्या सुवर्णपदकावर 3-1 अशा भक्कम आघाडीसह शिक्कामोर्तब केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: तयारीला लागा! पावसाचे सावट दूर होणार, पुढील आठवडा कोरडा; तुलसी विवाहाचा मार्ग मोकळा

Venkateswara Temple Stampede: आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; नऊ भाविकांचा मृत्यू Video

Goa Tourism: गोव्याचं पर्यटन संपलं नाही वाढलं! पर्यटन मंत्र्यांनी थेट आकडेवारीच दिली, सोशल मीडियावरील दावे काढले खोडून

Goa Today's News Live: केळशीचे सरपंच डिक्सन वाझ बाणावलीतून लढवणार विधानसभा निवडणूक

Karvi Flowers: श्री गणेशाने हत्तीचे रूप घेतले, मुरुगन आणि वल्लीचे लग्न झाले; गोव्यात फुलणाऱ्या 'कारवी'चे महत्व

SCROLL FOR NEXT