Karmal Ghat 75.46 cr Approved central government Dainik Gomantak
गोवा

Canacona News : करमल घाट भूसंपादनासाठी ; केंद्र सरकारकडून 75.46 कोटी मंजूर

त्यासाठी जमीन मालकांना १२० रूपये प्रमाणे प्रति चौरस मीटर मोबदला देण्यात येणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News :काणकोण, : करमल घाटातील अरूंद रस्त्यामुळे या टापूत वारंवार अपघात होतात. बेंदुर्डे ते चाररस्ता पर्यंतच्या चारपदरी रस्त्याच्या बांधणीसाठी भूसंपादनासाठी ७५.४६ कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत.

दोन टप्प्यात भूसंपादन पूर्ण करण्याची केंद्रीय रस्ता मंत्रालयाने गोवा सरकारला सूचना केली आहे.बेंदुर्डे येथील ६४४२१ चौरस मीटर जमीन संपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी जमीन मालकांना १२० रूपये प्रमाणे प्रति चौरस मीटर मोबदला देण्यात येणार आहे.

कोर्डें येथील ६३०७७ चौरस मीटर,बार्शे येथील ७०३८१.४० चौरस मीटर,पाडी येथे१७३७.९६ चौरस मीटर,नगर्से येथे ३०४३७.७९ चौरस मीटर जमीन संपादित करण्यात येईल. त्यासाठी जमीन मालकांना २४० रूपये प्रति चौरस मीटर मोबदला देण्यात येईल.

काणकोण मध्ये ४६५६४ चौरस मीटर जमीन संपादन करण्यात येईल, जमीन मालकांना प्रति चौरस मीटर ३०० रूपये मोबदला देण्यात येईल. चारपदरी रस्त्यासाठी एकूण २ लाख ९२ हजार ३०८ चौरस मीटर जमीन संपादित करण्यात येईल.

त्यासाठी १३ कोटी ९ लाख ५६ हजार ६८६ रूपये खर्च करण्यात येतील.या मार्गातील बांधकामे व वृक्षांसाठी ३.५ कोटी रूपयांची तरतूद आहे.

पहिल्या टप्प्यात २०२३-२४ आर्थिक वर्षात एकूण खर्चाच्या ४० टक्के रक्कम म्हणजे ३०.६२४ कोटी रुपये खर्च करण्यात येतील तर २०२४-२५ आर्थिक वर्षात उर्वरित ६० टक्के म्हणजे ४४.८३६ कोटी रूपये वापरण्यात येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

SCROLL FOR NEXT