Kargil Vijay Diwas in Valpoi Dainik Gomantak
गोवा

Kargil Vijay Diwas : वाळपईत माजी सैनिक संघटनेतर्फे कारगिल विजयी दिवस साजरा

कारगील युद्धाच्या आठवणींना वाळपईमध्ये उजाळा देण्यात आला.

दैनिक गोमन्तक

सपना सामंत

वाळपई : गोव्यात अनेक ठिकाणी कारगील विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. वाळपईमध्येही कारगील विजय दिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. वाळपई येथील शहीद स्तंभ येथे देशासाठी शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहून माजी सैनिक संघटनेतर्फे कारगील विजयी दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी कारगील युद्धाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. कारगील विजयी दिवस साजरा करण्यासाठी वाळपईतील सरकारी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीवर्ग तसेच शिक्षकांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते शहीद जवानांना पुष्प अर्पण करण्यात आले.

या कारगील विजय दिवस कार्यक्रमासाठी माजी सैनिक संघटनेचे सागर सावंत, चंदन ठाकूर, दामोदर गावकर, प्रमोद गावकर, गौरेश गावस, सुरेश कुमार, गिरीष गावस, अमर माजीक, संदीप गावस, सिद्धेश गडेकर, आदी पदाधिकारी, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अशोक आमशेकर, सत्तरी अर्बन कॉ. सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मण गावस तसेच अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT