karapura kolamba lake  Dainik Gomantak
गोवा

Kolamba Lake: कमळांसाठी प्रसिद्ध असलेले गोव्यातील 'कोळम' तळे उद्धाराच्या प्रतीक्षेत! पर्यटनदृष्ट्या विकास होण्याची गरज

Karapur Kolamba Lake: शेती बागायतीसाठी वरदान असलेल्या या तळ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यास बराच वाव असून, तळ्याचा विकास झाल्यास गावच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे.

Sameer Panditrao

डिचोली: कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रातील कोळमवाडा येथील दुर्लक्षित ‘तळ्या’चा ‘हिंटरलँड’ पर्यटनांतर्गत विकास करावा, अशी मागणी पुढे येत आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि लाल कमळांसाठी प्रसिद्ध असलेल्या या तळ्याचे अलीकडेच पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

शेती बागायतीसाठी वरदान असलेल्या या तळ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यास बराच वाव असून, तळ्याचा विकास झाल्यास गावच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे. या तळ्याच्या विकासासाठी विद्यमान आमदार प्रेमेंद्र शेट हेही आग्रही आहेत. त्याशिवाय गावचा आर्थिक विकास होण्यासही हातभार लागणार आहे. या तळ्याचा विकास करावा, असा प्रस्तावही स्थानिक पंचायतीने बारा वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना सादर केला होता, अशी माहिती मिळाली आहे.

कोळमवाडा-कारापूर येथे रस्त्याच्या बाजूलाच असलेले नैसर्गिक तळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या प्रत्येकाला आकर्षित करत असते. या तळ्यात जेव्हा लाल रंगाची कमळे फुलतात, त्यावेळी तळ्याचे सौंदर्य खुलून दिसते. उन्हाळ्यात या तळ्याचा बांध घालून पाणी अडविण्यात येते. या तळ्यातील पाणी वायंगण शेती आणि बागायती पिकासाठी वरदान ठरत आहे. या तळ्याचा विकास करण्यास दुर्लक्ष होत असल्याने दिवसेंदिवस हे तळे प्रदूषणाच्या विळख्यात अडकत आहे.

प्रदूषणाचे संकट

सध्या या तळ्यात पालापाचोळा साचला असून, जलपर्णीही वाढली आहे. या तळ्यात गुरांचाही अधूनमधून वावर असतो. दरवर्षी मान्सूनच्या तोंडावर या तळ्याचा बांध फोडून तळ्यातील पाण्याबरोबर गाळही बाहेर सोडण्यात येतो. तरीदेखील हे तळे समस्यांच्या विळख्यात आहे. या तळ्याचा विकास झाला नाही, तर त्याचे अस्तित्व संकटात येण्याचा धोका आहे. तशी भीतीही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव दुर्लक्षित

कोळम तळ्याचा विकास होणे काळाची गरज आहे. २०१२ साली तत्कालीन पंचायत मंडळाने या तळ्याचे सौंदर्यीकरण करावे, असा प्रस्ताव केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना सादर केला होता. मात्र त्याकडे विशेष गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. या तळ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याकडे सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी आता पुढे होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT