Karapur woman suspicious death Dainik Gomantak
गोवा

Karapur: ..हा अपघाती मृत्यू नाही, घातपाताचा प्रकार! कारापूर प्रकरणी निघणार 'मशाल मोर्चा'; काय आहे प्रकरण Watch Video

Karapur Woman Death: मालमत्तेच्या वादातून यापूर्वी वासंती हिच्यावर प्राणघातक हल्लेही झाले होते. विषप्रयोगही झाले होते. न्याय मिळावा यासाठी वासंती हिने सहा महिन्यांपूर्वी राजधानी पणजीत उपोषण केले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: कारापूर येथील वासंती रामा सालेलकर या अविवाहित महिलेचा मृत्यू हा घातपाताचा प्रकार असून भू-माफियांकडून नियोजनबद्ध पद्धतीने वासंतीचा काटा काढला असावा, असा संशय ''गाकुवेध'' महासंघाचे उपाध्यक्ष रामकृष्ण जल्मी यांच्यासह ॲड. अजय प्रभूगावकर, स्वप्नेश शेर्लेकर आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

विजेचा ''शॉक'' लागून वासंतीचा मृत्यू झाल्याचा संशय असला तरी यापूर्वीची पार्श्वभूमी आणि वासंती हिने यापूर्वी केलेले दावे पाहता मालमत्तेच्या वादातूनच तिचा बळी घेतला असण्याची शक्यता असून पोलिसांनी याप्रकरणी सखोल आणि निःपक्षपातीपणे चौकशी करावी आणि मृत वासंतीच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, मृत वासंतीला न्याय मिळावा, यासाठी येत्या रविवारी (ता. ७) सायंकाळी ६ वा.''मशाल मोर्चा'' काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारापूर येथील ज्या घरात वासंती मृत्यूमुखी पडली होती, तेथून डिचोलीच्या पोलिस ठाण्यापर्यंत ''मशाल मोर्चा'' काढण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते ॲड. अजय प्रभुगावकर यांनी दिली.

सामाजिक संघटना आदी नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या पत्रकार परिषदेवेळी आश्विन चोडणकर, दिलीप गावस, विनोद धुरी, हर्षा वाडकर, गौरेश घाडी, हरी गावडे, किशोर दिवकर आदी उपस्थित होते.

वासंतीचा घातपातच...?

कारापूर येथील ज्या मालमत्तेतील घरात वासंती राहत होती, त्या मालमत्तेवर भू-माफियांचा डोळा होता. या मालमत्तेचा वाद न्यायप्रविष्ट होता. मालमत्तेच्या वादातून यापूर्वी वासंती हिच्यावर प्राणघातक हल्लेही झाले होते. विषप्रयोगही झाले होते. न्याय मिळावा यासाठी वासंती हिने सहा महिन्यांपूर्वी राजधानी पणजीत उपोषण केले होते.

या घटना पाहता सरकारने तिला वेळीच संरक्षण देऊन हल्लेखोरांना गजाआड करायला हवे होते. पण सरकारच्या नाकर्तेपणामुळेच वासंतीला प्राण गमवावे लागले आहेत, असा दावा रामकृष्ण जल्मी यांनी केला.

जमिनीसंदर्भातच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भू-माफियांचे आयतेच फावले आहे. जमिनी बळकावण्याच्या हव्यासापोटी निष्पाप गोमंतकीयांचे बळी जात आहे. वासंतीचा मृत्यू हा जमिनीच्या वादातून झाला असून, याला मुख्यमंत्र्यांसह अन्य एक मंत्री आणि आमदार कारणीभूत आहे, असा आरोप स्वप्नेश शेर्लेकर यांनी यावेळी केला.

वासंती मृत्यू प्रकरणाचा योग्यपद्धतीने तपास करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अश्विन चोडणकर आणि दिलीप गावस यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Revoda Fire: AC मध्ये झाले शॉर्टसर्किट, फ्लॅटला लागली आग; 6 लाखांचे नुकसान, 2 युवती जखमी Video

Goa Today Live Updates: भाजपला मोठा धक्का! बाबू आजगावकर यांचा तोरसे झेडपी निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Bhoma: 'भोममधील मंदिरांची हानी होणार नाही'! मंत्री नितीन गडकरींचे स्पष्टीकरण; लोकसभेत कॅ. विरियातोंनी विचारला प्रश्‍‍न

लग्नाचे आश्वासन देऊन महिलेशी केली मैत्री, लैंगिक अत्याचार करून दिली जीवे मारण्याची धमकी; वडिल, मुलाचा फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज

Harbhajan Singh: "मोहम्मद शमी कुठेय?" टीम इंडियाच्या सिलेक्शनवर हरभजन सिंह संतापला; गंभीर-आगरकर यांच्यावर उठवली टीकेची झोड!

SCROLL FOR NEXT