Sports Ground |Bicholim Dainik Gomantak
गोवा

Sports Ground: कारापूर क्रीडामैदान जागेत कचरा शेड नको !

डिचोली तालुक्यातील संतप्त युवकांची मागणी- जेसीबी अडवून जमीन सपाटीकरण रोखले

दैनिक गोमन्तक

Bicholim Sports Ground: डिचोली तालुक्यातील कारापूर गावात पंचायतीतर्फे बांधण्यात येणाऱ्या सुका कचरा ठेवण्यासाठीच्या ‘मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी’ शेडचा विषय तापण्याची चिन्हे दिसत आहेत. कारापूर येथील नियोजित क्रीडामैदानाच्या जागेत शेड उभारण्यास स्थानिक युवकांचा तीव्र विरोध आहे.

हे शेड बांधण्यासाठी आज (सोमवारी) जेसीबी मशीनद्वारे जमीन सपाटीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, संतप्त युवकांनी जमीन सपाटीकरणाचे काम रोखले.

दरम्यान, सायंकाळी सुनील पोकळे यांच्यासह अन्य स्थानिक युवकांनी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी तसेच मामलेदारांना आपल्या मागणीचे निवेदनही दिल्याची माहिती मिळाली आहे. क्रीडामैदान हवे, अशी मागणीही या युवकांनी केली. आता पंचायत कोणती भूमिका घेते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

न्यायालयीन आदेशानुसार प्रत्येक पंचायतीने कचरा शेड बांधणे बंधनकारक आहे. त्यानुसार कारापूर पंचायतीने मैदानासाठी आरक्षित ज्ञानज्योती विद्यालयासमोरील जागेत सुका कचरा ठेवण्यासाठी हे शेड बांधण्याचा पंचायतीचा प्रस्ताव आहे.

ग्रामसभेतही झाला होता विरोध

वर्षांपूर्वी म्हणजेच 21 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या पंचायतीच्या ग्रामसभेतही या मुद्यावर गरमागरम चर्चा झाली होती. आम्हाला त्वरित क्रीडामैदान उपलब्ध करून द्या.

अशी मागणी स्थानिक युवकांनी करतानाच, मैदानासाठी आरक्षित ठेवलेल्या जागेत ‘मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी’ शेडला कडाडून विरोध केला. हा प्रकल्प मैदानाच्या जागेत सोडून अन्यत्र उभारा, अशी मागणीही उपस्थित युवकांनी करून, तसा ठराव घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT