Karapur Sarvan Sarpanch Dainik Gomantak
गोवा

Karapur Sarvan Sarpanch: कारापूर-सर्वण सरपंच निवडीसाठी मंगळवारी बैठक, बिंदिया सावंत यांचे नाव निश्‍चित तरी उत्सुकता

Goa Panchayat: कारापूर-सर्वणच्या रिक्त सरपंचपदासाठी मंगळवारी (ता. ३०) निवडणूक होणार आहे. सकाळी ११ वाजता पंचायत मंडळाची बैठक होणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: कारापूर-सर्वणच्या रिक्त सरपंचपदासाठी मंगळवारी (ता. ३०) निवडणूक होणार आहे. सकाळी ११ वाजता पंचायत मंडळाची बैठक होणार आहे. सध्या वादग्रस्त प्रकल्पावरून कारापूर गावातील वातावरण तापलेले आहे.

वादग्रस्त प्रकल्पावरून आंदोलनकर्त्या लोकांनी यापूर्वी पंचायतीत घातलेला गोंधळ पाहता, सरपंचपदाच्या या आव्हानात्मक खुर्चीवर आता कोण विराजमान होणार, याकडे पंचायत क्षेत्रातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, सत्ताधारी गटातर्फे सरपंचपदासाठी बिंदिया सावंत यांचे नाव निश्चित झाले असून त्यांचीच सरपंचपदी निवड होणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. एकूण अकरापैकी सत्ताधारी गटात सात पंचसदस्यांचा समावेश आहे.

पाचव्या सरपंचाचे वेध

गेल्या १६ जानेवारी रोजी दिव्या नाईक यांची सरपंचपदी निवड झाली होती. मात्र त्यांनी चार महिने पूर्ण होण्याआधीच, दीड महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे सरपंचपदाची खुर्ची रिक्त आहे. विद्यमान पंचायत मंडळाच्या कार्यकाळात आतापर्यंत या पंचायतीला चार सरपंच मिळाले आहेत. आता पाचव्या सरपंचाचे वेध लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

Viral Video: प्रवाशांची गर्दी अन् चोरट्याचा प्लॅन तयार! दिल्ली मेट्रोमध्ये बिनधास्त चोरी; कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ चर्चेत

Saleli Car Fire: सालेलीत कार आगीत जळून भस्‍मसात; 5 लाख रुपयांचे नुकसान; गाडीनं अचानक पेट घेतल्‍यानं खळबळ

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT