Karapur - Sarvan  Dainik Gomantak
गोवा

Karapur - Sarvan News : कारापूर-सर्वणच्या सरपंचपदी तन्वी सावंत बिनविरोध निवड

Karapur - Sarvan News : विरोधी गट अनुपस्थित ः उपसरपंचपदासाठी लवकरच होणार निवड

गोमन्तक डिजिटल टीम

Karapur - Sarvan News :

डिचोली, कारापूर-सर्वण पंचायतीत सत्ताबदल होताना सरपंचपदाची माळ अखेर सौ. तन्वी सावंत यांच्या गळ्यात पडली आहे.

शुक्रवारी (ता.१२) झालेल्या बैठकीत सौ. सावंत यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. दत्तप्रसाद खारकांडे यांची सरपंचपदावरून उचलबांगडी केल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. रिक्त सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यासाठी शुक्रवारी पंचायत मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती.

दावरून पदच्युत केल्यानंतर गेल्याच आठवड्यात उपसरपंच सौ. उज्वला कवळेकर यांची उपसरपंच पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामुळे पंचायतीचे उपसरपंच पद रिक्त झाले आहे. त्यामुळे उपसरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक कधी होणार, ते पहावे लागणार आहे.

पदच्युत सरपंच खारकांडे आणि उपसरपंच उज्वला कवळेकर यांच्यासह त्यांच्या गटातील अन्य दोन मिळून चार पंचसदस्यांनी मात्र आजच्या बैठकीकडे पाठ केली. हे चारही पंच आजच्या बैठकीस उपस्थित राहिले नाही.

दरम्यान, पंचायतीत भाजप गटात फूट पडून सरपंच बदल झाला असला, तरी ही पंचायत भाजपचीच असल्याचा दावा नवनिर्वाचित सरपंचांनी केला आहे. रिक्त सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यासाठी शुक्रवारी बोलाविण्यात आलेल्या बैठकीस अकरा पंचसदस्यांपैकी तन्वी सावंत यांच्यासह दिव्या नाईक, अवनी सावंत, बीवी आयेशा मागोड, लक्ष्मण गुरव, दामोदर गुरव आणि योगेश पेडणेकर हे सात पंचसदस्य हजर होते.

तर दत्तप्रसाद खारकांडे, उज्वला कवळेकर, सुरेखा खारकांडे आणि ज्ञानेश्वर बाले हे चार पंचसदस्य अनुपस्थित होते. सरपंच पदासाठी सौ. तन्वी सावंत हिने एकमेव अर्ज सादर केला. निर्वाचन अधिकारी प्रतापराव राणे यांनी हा अर्ज ग्राह्य धरून सौ. सावंत यांची सरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले. पंचायत सचिव महादेव नाईक यांनी निवडणूक प्रक्रियेवेळी सहकार्य केले.

स्थानिक आमदारांसह भाजप सरकारच्या मदतीने पंचायत क्षेत्राचा विकास करणार. पंचायत क्षेत्रात ''एमआरएफ''शेड उभारण्यावर तसेच घरपट्टी वाढ कमी करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर महिलांना स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर करण्यासाठी योजना राबविणार. सत्ताबदल झाला असला, तरी ही पंचायत भाजपचीच आहे.

- सौ. तन्वी सावंत, नवनिर्वाचित सरपंच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: सांगेत बिरसा मुंडा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

गोकुळची ‘ती’ फुगडी स्पर्धा ठरली अखेरची! एकुलता एक मुलगा, अर्धांगवायू झालेला पती; कमावत्या महिलेचा Heart Attack ने मृत्यू

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT