Canacona Dainik Gomantak
गोवा

काणकोण पालिकेची अनधिकृत गाड्यावर कारवाई

काणकोण पालिकेने (Canacona Municipality) आज अन अधिकृत गाड्यावर कारवाई करत काही गाडे हटवले‌.

दैनिक गोमन्तक

काणकोण पालिकेने (Canacona Municipality) आज अन अधिकृत गाड्यावर कारवाई करत काही गाडे हटवले‌. दोन- तीन दिवसामागे पालिकेच्या मासळी मार्केटच्या (Fish market) पाठीमागे पालिकेच्या जागेत सुमारे साडेपाच मीटर लांब व अडीच मीटर रुंद पत्र्याचा गाडा उभा करण्यात आला होता. यापूर्वी या जागेत महिला मंडळाने आपली उत्पादने विकण्यासाठी पालिकेकडे जाग्याची मागणी केली होती ती मागणी पालिकेने मान्य केली नाही. त्या जागी एका रात्रीत गाडा उभा झाल्याने महिला मंडळाच्या सदस्यांनी याचा जाब मुख्याधिकारी उदय प्रभूदेसाई यांना विचारला. मुख्याधिकाऱ्यानी त्वरीत कारवाई करत जेसीबीच्या साह्याने हा गाडा जमिनदोस्त केला.त्यापूर्वी बुधवारी या व अंन्य अन अधिकृत गाड्याचे पालिका कर्मचाऱ्यांनी सर्व्हेक्षण केले.

आज कारवाई करण्यापूर्वी पालिकेने हा गाडा उभा केला आहे त्याने पुढे येऊन तो स्वतः हून मोडून काढण्याचे आवाहन केले त्यासाठी पहिल्यांदा दहा मिनिटाचा अवधी देण्यात आला त्यानंतर एक नागरीक पुढे आला त्याला अर्धा तासाचा अवधी देण्यात आला मात्र त्या काळात त्याने स्वतः हून गाडा न मोडल्याने पालिकेने जेसीबीच्या साह्याने गाडा जमिनदोस्त केला.

करोना महामारीच्या (Covid19) काळात पालिका क्षेत्रातील चावडी येथे मोकळ्या जागेत रात्रीच्यावेळी अनअधिकृत गाडे उभे राहत आहेत.त्यासाठी या सर्व गाड्याचे सर्व्हेक्षण करून अनाधिकृत गाडे हटविण्यात येणार आहेत.मुख्याधिकारी उदय प्रभू देसाई (Uday Prabhu Desai) यांनी पालिका मंडळाच्या निर्णयाप्रमाणे ही कारवाई सुरू केली आहे. या अनधिकृत गाड्या पासून पालिकेला कोणताच महसूल प्राप्त होत नाही उलट कचरा संकलन करण्यासाठी पालिकेला खर्च करावा लागतो त्याचसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो (Simon Ribello) यांनी सांगितले.

चावडी येथील पिकअप स्टॅडवर दहा गाडे आहेत.त्यामध्ये रस्सा आम्लेट, भेळपुरी, पावभाजीच्या गाड्याचा समावेश आहे.हल्लीच कर्फ्युमुळे भाजी मार्केट बंद असल्याने काही विक्रेत्यांनी या ठिकाणी भाजीचे गाडे सुरू केले.त्याशिवाय कदंब बसस्थानकाच्या बाहेरच्या बाजूला काही गाडे आहेत.दिवसेंनदिवस त्यामध्ये भर पडत आहे.काही गाड्याना फिरते गाडे म्हणून परवानगी देण्यात आली आहे.त्यानी ते गाडे रात्रीच्यावेळी तेथून हलवणे बंधनकारक आहे.मात्र त्यापैकी बहुतेक गाडे त्याचजागी कायमस्वरूपी ठेवण्यात येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'रामा'ही गोव्यात सुरक्षित नाही; राजकीय नेत्यांकडून काणकोणकरांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध

Ramesh Tawadkar: मंत्रिपद नकोच होते! का झाले रमेश तवडकर मंत्री? चार दिवसांनी दिले स्पष्टीकरण

पायाला धरुन ओढले, कपडे फाडली, पाच जणांनी गुरासारखे धोपटले; काणकोणकरांना केलेल्या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

World Athletics Championship: नीरज चोप्राचं हुकलं पदक, वॉलकॉटन जिंकलं 'गोल्ड'

"कंगना बकवास बोलते, ती आली तर कानाखाली मारा" काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT