Nilesh Cabral Danik Gomantak
गोवा

काणकोण महामार्ग दुरुस्ती, निर्णय 30 पर्यंत : काब्राल

काणकोण तालुक्यातील करमल घाट ते मनोहर पर्रीकर बगलरस्त्यापर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग 66चा भाग अपघातग्रस्त असल्याने त्याची दुरुस्ती व विस्तारीकरण करण्याची किंवा डोंगर कापून बोगद्यातून दुसरा रस्ता निर्माण करण्याची मागणी काणकोणवासीयांकडून होत आहे.

दैनिक गोमन्तक

सासष्टी : काणकोण तालुक्यातील करमल घाट ते मनोहर पर्रीकर बगलरस्त्यापर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग 66चा भाग अपघातग्रस्त असल्याने त्याची दुरुस्ती व विस्तारीकरण करण्याची किंवा डोंगर कापून बोगद्यातून दुसरा रस्ता निर्माण करण्याची मागणी काणकोणवासीयांकडून होत आहे. या विषयावर बोलताना सर्व संबंधितांकडे सविस्तर चर्चा झाली व 30 जूनपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले.

यासंबंधी चर्चा करण्यासाठी काब्राल तसेच काणकोणचे आमदार व सभापती रमेश तवडकर यांनी संबंधितांची बैठक मडगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विद्यमान रस्ता दुरुस्ती व रुंदीकरण केल्यास जवळजवळ 13,471 झाडे कापली जातील, असे सल्लागाराने अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे काही पर्यावरणवादी नागरिकांचा त्यास विरोध आहे. पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही, असे आपण त्यांना सांगितल्याचे काब्राल म्हणाले.

हा रस्ता 3.9 किलोमीटरचा आहे व बोगदा जवळजवळ 1.5 कि. मी. अंतराचा आहे. त्यामुळे बोगद्याच्या दोन्ही बाजूला 750-750मीटर लांबी व 45 मीटर रुंदी असल्याने त्या परिसरातील झाडेही कापणे अपरिहार्य असणार आहे. शिवाय बोगदा रस्त्याला 600 कोटी रुपये तर सध्याच्या रस्ता दुरुस्तीला केवळ 100 कोटीच्या खर्चाचा अंदाज आहे, असे काब्राल म्हणाले. सभापती तवडकर यांनी महामार्ग दुरुस्तीची दखल घेतल्याबद्दल काब्राल यांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

DA Hike: 64 टक्के महागाई भत्ता झाल्यास पगारात किती वाढ होणार? 18,000 ते 56,100 बेसिकवर पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Miramar Beach Clash: व्यवसायाच्या जागेवरून वाद अन् थेट हाणामारी; मिरामार समुद्रकिनाऱ्यावर दोन गट आमनेसामने, 8 जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT