Kala Academy controversy Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: कला अकादमीतील तो प्रकार 'तांत्रिक बिघाडच'! पोंक्षेच्या 'पुरुष' नाटकावर मंत्री गावडेंचं स्पष्टीकरण

Govind Gaude on Purush Natak: प्राथमिक दृष्ट्या हा प्रकार मानवी चुकीमुळे नसून, रंगमंचावरील प्रकाशयोजनेत आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे घडल्याचे त्यांनी म्हटले आहे

Akshata Chhatre

पणजी: शरद पोंक्षे यांच्या पुरुष नाटक प्रयोगाच्यावेळी पणजीतील कला अकादमी येथे १३ एप्रिल २०२५ लाईटमध्ये आलेल्या बिघाडामुळे पहिला अंक काही काळासाठी थांबवण्यात आला होता. यावर कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्राथमिक दृष्ट्या हा प्रकार मानवी चुकीमुळे नसून, रंगमंचावरील प्रकाशयोजनेत आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे घडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अकादमीने दिलेल्या माहितीनुसार, दीनानाथ मंगेशकर कला मंदिरमधील संपूर्ण प्रकाशयोजना कॅनरा कंपनीच्या एलईडी दिव्यांनी बनलेली आहे. हे दिवे एका साखळी पद्धतीने जोडलेले गेलेत ज्यामुळे एका दिव्यामध्ये जरी बिघाड झाला तरी त्याचा परिणाम सगळ्या सर्किटवर होतो आणि सर्व दिवे बंद शकतात.

या प्रकाशयंत्रणेची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कराराअंतर्गत असलेल्या कंत्राटदाराद्वारे केली जाते. कंत्राटदाराकडून वेळोवेळी सेवा व दुरुस्ती केली जात असल्याचे अकादमीने नमूद केले.

शरद पोंक्षे आणि इतर कलाकारांकरवी सुरु असलेल्या 'पुरुष' नाटकाचा प्रयोग दुपारी ३:३७ वाजता कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू झाला होता.

मात्र ४:४० वाजता रंगमंचावरील एका दिव्यामध्ये फ्लिकरिंग सुरू झाल्याने हळूहळू सर्व दिवे फ्लिकर होऊ लागले. नाटकाच्या लाईट ऑपरेटर आणि कला अकादमीच्या कर्मचाऱ्यांनी कन्सोलवरून हा बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांना यश आले नाही.

हा बिघाड सिस्टीममध्ये असल्याने नाटक दहा मिनिटांसाठी थांबवावं लागलं होतं. त्यानंतर तात्पुरती व्यवस्था म्हणून हेलोजन लाईट्सचा वापर करून प्रयोग पुन्हा सुरू करण्यात आला. रंगमंचावर पूर्ण सेट उभारलेला असल्याने प्रयोग सुरू असताना लाईट दुरुस्त करणे शक्य नव्हते,

प्रयोग संपल्यानंतर संपूर्ण लाईट बॅटन खाली उतरवून तपासणी केली असता एका ब्लिंडर लाईटमध्ये बिघाड असल्याचे आढळून आले. तांत्रिक टीमने तात्काळ या ब्लिंडर लाईटला बायपास करून प्रकाशयोजना पूर्ववत केली आहे.

शिवाय भविष्यात असा प्रसंग ओढवू नये म्हणून कला अकादमीने टंगस्टन फिलामेंट प्रकाशयोजना असलेला एक पर्यायी बॅकअप प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेजक्राफ्ट आणि लाईटिंग समिती तसेच टास्क फोर्स समितीने दिलेल्या सूचनांच्या आधारे विद्यमान प्रकाशयोजना अपग्रेड केली जाईल, असे अकादमीने स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: आलेमाओ यांनी सभागृहाला स्ट्रीट प्रोव्हिडन्सच्या वापर प्रमाणपत्राची माहिती दिली

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

SCROLL FOR NEXT