पणजी: गोवा कला अकादमीचे नूतनीकरण व ओडीपी-पीडीएमधील भ्रष्टाचाराबाबत दिलेल्या तक्रारीत काहीच तथ्य नसल्याचा निष्कर्ष काढला असला तरी हे तपास काम दक्षता खात्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सरकारच्या दबावामुळे बंद केले आहे. या निर्णयाविरोधात लोकायुक्त किंवा न्यायालयात जनहित याचिका सादर करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी दिली.
(Kala Academy, ODP-PDA case closed due to pressure)
दक्षता खात्याकडे दाखल केलेल्या तक्रारींची प्राथमिक चौकशी सुरू करण्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला त्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी बोलाविण्याची गरज होती. भ्रष्टाचारसंदर्भात पुरावे आहेत का, याची विचारणा करायला हवी होती. मात्र कोणतीच चौकशी, शहानिशा न करता पोलिस निरीक्षकांनी मला पत्र पाठवून तपासकाम बंद करण्यात आल्याचे कळविले. कला अकादमी संकुल नूतनीकरणाच्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा निष्कर्ष काढण्यास लावून सरकारने दक्षता खाते कमकुवत करण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा आरोपही ताम्हणकर यांनी केला.
कला अकादमी संकुलाचे काम नियम धाब्यावर बसवूनकरण्यात येत आहे. या कामावर जनतेच्या सुमारे 50 कोटी रुपयांचा चुराडा होत आहे. तूरडाळ नासाडी प्रकरणाची चौकशी सरकारने दक्षता खात्याकडे सोपविली आहे. यात मुख्यमंत्री व तत्कालीन नागरीपुरवठामंत्री गुंतलेले असताना तत्कालीन संचालकाला बळीचा बकरा बनविण्यात आले आहे, असेही ताम्हणकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.