Kala Academy hosts 50th Tiatr competition in Goa
पणजी: आजपासून कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर कला मंदिरमध्ये 50व्या अ गट तियात्र स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे 'तियात्र' या माध्यमाचा अस्सल अविष्कार सादर करणारे ते एक व्यासपीठ आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आज व्यवसायिक तियात्रात देखील जिथे पारंपारिक तियात्राचे सर्व घटक पाहायला मिळणे मुश्किल झाले आहे तिथे या स्पर्धेत सादर होणार्या तियात्रात मात्र आपल्याला ते पहायला मिळतात. या स्पर्धेची ती सर्वात महत्त्वाची अट असते.
पारंपारिक तियात्र शैलीत या स्पर्धेत सादरीकरणे होत असली तरी गेल्या 50 वर्षात स्पर्धेत सादर होणाऱ्या तियात्रांमध्ये आशयदृष्ट्या तसेच तंत्रदृष्ट्या अनेक प्रयोग प्रेक्षकांनी अनुभवले आहेत, जे सहसा व्यावसायिक यात्रांमध्ये अनुभवायला मिळत नाहीत आणि अशा प्रयोगांना प्रेक्षकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
नाट्यशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या तसेच हिंदू नाट्य कलाकारांच्या सहभागाने या स्पर्धेला नक्कीच एक वेगळा दर्जा मिळवून दिला आहे. तियात्र स्पर्धेत सादर होणारी तियात्र सादरीकरणे त्यामुळे खऱ्या अर्थाने धर्मसापेक्ष असतात असे म्हणायला हरकत नसावी.
तियात्र स्पर्धेतील कलाकारांची पारितोषिके मिळवण्याची ईर्ष्याही इतकी तीव्र असते की निकालानंतर त्यावरचे पडसाद अनेक दिवस तिरीमिरीने उमटत राहताना दिसतात.
यंदाच्या 50 व्या अ गट तियात्र स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात भाग घेणारे तियात्र लेखक/दिग्दर्शक तोमाझिन कार्दोज यांनी 50 वर्षांपूर्वीच्या पहिल्या तियात्र सादरीकरण स्पर्धेतही लेखक/दिग्दर्शक या नात्याने आपला सहभाग नोंदवला होता. हा एक अनोखा विक्रम असेल. त्यांनी आतापर्यंत या स्पर्धेत एकूण ४० तियात्रे लिहून व दिग्दर्शित करून सादर केली आहेत. यंदाचे 'ओह गोवा' हे त्यांचे तियात्र स्पर्धेतील ४१ वे सादरीकरण आहे.
१० मार्च- ‘रेस्ट इन पीस’ (पाशेकोज ड्रॅमेटीक अँड कल्चरल असोसिएशन, कुडतरी)
११ मार्च- ‘वावटोळ’ (ताळगाव डॅमॅटिक ग्रुप, ताळगाव)
१३ मार्च- ‘केलोले उरता’ (दृष्टी एंटरटेनमेंट, कुडचडे)
१४ मार्च- ‘ओदृष्टा फाटले ओदृष्ट’ (सां बोर्तोलोमिओ स्पोर्ट्स क्लब अँड कल्चरल असोसिएशन, चोडण)
१५ मार्च- ‘वाऱ्यार उबतोलो कापूस’ (माची मोगी मोरजी कल्चरल सांस्कृतिक संस्था, मोरजी)
१७ मार्च- ‘ओह गोवा’ (माची मोगी, कांदोळी)
१८ मार्च - ‘बोगणार’ (सेंट डॉमनिक ड्रॅमेटिक ग्रुप, मेरशी)
१९ मार्च- ‘आद्वारलोली फोलां’ (माची मोगी, सांताक्रुज)
२० मार्च- ‘आयज म्हाका, फाल्या तुका’ (मातियास क्रिएटिव्ह ग्रुप, कळंगुट)
२१ मार्च- ‘जाग्रोणाची रात’ (बरेभाट सोशल अँड कल्चरल असोसिएशन, राया)
२४ मार्च- ‘दि हिलिंग हाऊस’ (गोवन डॉट कॉम सोशीओ अँड कल्चरल असोसिएशन, कांदोळी)
२५ मार्च- ‘दुसरें जीवित’ (ड्रॅमॅटिक ट्रूप ऑफ रायबंदर)
२५ मार्च- ‘आमकां नीत कोण दितोलो’ (सांत मातेवांची नोकेत्रा, आजोशी
२८ मार्च- ‘तू म्हाका जाय’ (जे. जे. प्रोडक्शन्स, सांताक्रुज)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.