Purush Natak controversy Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: कला अकादमीतील प्रसंगाला जबाबदार कोण? पीडब्ल्यूडीकडे बोट रोखत मंत्री गोविंद गावडेंनी केले हात वर

Govind Gaude News: कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्यावर नाट्यप्रेमी तसेच इतरांकडून रोष व्यक्त करण्यात आला, दोन दिवसानंतर मंत्र्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली

Akshata Chhatre

पणजी: मराठीतील प्रख्यात नट शरद पोंक्षे आणि संपूर्ण 'पुरुष' नाटकाचा गट गोवा दौऱ्यावर आहे. रविवार (दि.१३) रोजी कला अकादमी पणजी इथे नाटकाचा प्रयोग सुरु होता, मात्र पहिल्या अंक सुरु असतानाच लाईट्स फ्लिकर झाल्याने नाटक काहीकाळासाठी थांबवावं लागलं होतं.

कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्यावर नाट्यप्रेमी तसेच इतरांकडून रोष व्यक्त करण्यात आला. यानंतर गोविंद गावडे नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त करतायत याकडे अनेकांचं लक्ष लागून होतं आणि दोन दिवसानंतर मंत्र्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

प्रियोळचे आमदार आणि मंत्री गोविंद गावडे यांनी कला अकादमीमध्ये झालेल्या प्रसांगावर पहिल्यांदा प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, मात्र घडलेल्या एकूण प्रकारची जबाबदारी न घेता त्यांनी पीडब्ल्यूडी खात्याजवळ बोट दाखवल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. माध्यमांना उत्तर देताना त्यांनी एकूण घटनेचा अहवाल मागितला असून एक-दोन दिवसांत हा अहवाल येणं अपेक्षित असल्याची माहिती दिलीये.

प्रख्यात वक्ते आणि अभिनेते शरद पोंक्षे यांनी गोव्यातील प्रयोगादरम्यान झालेल्या खोळंब्याबद्दल खेद व्यक्त केला. एवढ्या दुरून नट गोव्यात येतात, गोवा ही कलेची भूमी आहे आणि अशा खोळंब्याची अपेक्षा केली जात नाही असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सदर घटनेकडे लक्ष देण्याची मागणी केली होती.

नटांसाठी असलेले मेकअप रूम्स किंवा रंगमंचाच्या स्थिताकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले होते, मात्र अद्याप राज्याचे मुख्यामंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मौन सोडलेलं नाही.

नाटकादरम्यान प्रयोग थांबवताना शरद पोंक्षेंनी माफी मागितली होती मात्र यात पोंक्षेंची चूक नसल्याचं म्हणत ही चूक सर्वस्वीपणे कला अकादमीची असल्याचा दावा केला गोव्यातील प्रसिद्ध नट राजदीप नाईक यांनी केला. कला अकादमीचे पुनर्निर्माण झाल्यापासून अशा छोट्या-मोठ्या त्रुटींची वेळोवेळी दाखल घेतली जावी अशी मागणी स्थानिक कलाकारांकडून केली जायची मात्र यावर फारसं लक्ष दिलं गेलं नाही असं नाईक म्हणाले आहेत.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी देखील या घटनेला लाजिरवाणा प्रसंग म्हणत सरकार कला अकादमीचं मृत्युपत्र तयार करतंय का? असा सवाल उपस्थित केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT