Kala Academy
Kala Academy  Dainik Gomantak
गोवा

Kala Academy : मंत्री गावडेंसमोर आक्रंदन ; कलाकार संतापले

गोमन्तक डिजिटल टीम

Kala Academy :

पणजी, ‘चार्ल्स कुरैया’टच ‘कला अकादमी’चे ७५ कोटी रुपये खर्चून नूतनीकरण केल्‍यानंतर उद्भवलेल्‍या गंभीर समस्‍या १५ दिवसांत दूर कराव्‍यात. तसे न झाल्‍यास कलाकार रस्‍त्‍यावर उतरतील, असा सज्‍जड इशारा राज्‍यभरातून एकवटलेल्‍या कलाप्रेमी, कलाकारांनी आज सरकारला दिला.

कला व संस्‍कृतीमंत्र्यांनी पायउतार व्‍हावे; कला अकादमीप्रश्‍‍नी श्‍‍वेतपत्रिका जारी करावी, अशी ठासून मागणी करण्‍यात आली. पाटो येथील श्रमशक्ती भवनातील गोवा पत्रकार संघटनेच्या कार्यालयात सोमवारी सायंकाळी झालेल्या कला अकादमीवर प्रेम करणाऱ्या कलाकार, साहित्यिक, कला क्षेत्रात वावरणाऱ्यांची बैठक पार पडली.

यावेळी खुद्द कला व संस्‍कृतीमंत्री गोविंद गावडे उपस्‍थित राहिले. कलाकारांनी त्‍यांच्‍यासमोर आक्रंदन केले. बैठकीच्‍या अखेरीला काहीही प्रतिक्रिया व्‍यक्‍त न करता ते चालते झाले. यावेळी व्यासपीठावर चार्ल्स कुरैय्या फाउंडेशनच्या तन्वी कारिया, आर्मानियो रिबेलो, तियात्रिस्ट तोमाझिन कार्दोझ, देविदास आमोणकर व पत्रकार किशोर नाईक गावकर यांची उपस्थिती होती. कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे या बैठकीत उपस्थित होते. याप्रसंगी नऊ ठरावांना मंजुरी देण्यात आली.

त्रुटी, समस्यांचा वाचला पाढा; अनेकांचा उद्वेग

१ कला अकादमीच्या दुरुस्तीचे काम तीन वर्षे चालले, नूतनीकरणाच्या नावे या अकादमीच्या खर्चात सतत वाढ होत गेली आणि ती ९० कोटींवर पोहोचली. यात स्पष्टपणे भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे.

२ अकादमीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असल्याचे सांगत मंत्री गावडे या प्रकरणातून अंग काढून घेत आहेत, कला अकादमीची झालेली ही शोभा पाहता मंत्री गावडे यांनी राजीनामा द्यावा, असा सूर मान्यवरांनी व्यासपीठावरून व्यक्त केला.

३ या बैठकीचे निमंत्रक राजदीप नाईक यांनी नाटकाच्या सादरीकरणावेळी आलेला अनुभव कथन केला. नूतनीकरणाच्या कामावरून वापरण्यात आलेले साहित्य दुय्यम दर्जाचे आणि कामही निकृष्ट असल्याचे दिसून आल्याचा ठपका त्यांनी ठेवला.

४ अकादमीतील सरकता पडदा अत्यंत संथगतीने जात असून प्रकाशयोजना, ध्वनियंत्रणेत दोष असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

रस्त्यावर उतरणार

कला अकादमी ही राज्यातील कलाकारांची मातृसंस्था आहे, परंतु नूतनीकरणाच्या सदोष कामामुळे ती चर्चेत आली आणि तिचे पुरावेही पुढे आले. याप्रकरणी निवेदन देऊनही त्यावर स्पष्टीकरण मिळत नाही. अकादमीचे गमावलेले वैभव पुन्हा मिळावे, यासाठी राज्यातील कलाकार, साहित्यिकांनी मोठ्या संख्येने एकत्रित येत प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवीत आज एल्गार पुकारला.

गावडे यांनी घेतला काढता पाय!

कला अकादमी ही आशिया खंडातील वास्तुशास्त्राचा नमुना ठरली आहे. प्रख्यात वास्तुविशारद चार्ल्स कुरैय्या यांनी कला अकादमीची उभारणी केली. याच कला अकादमीवरून आज कलाकारांची बैठक पार पडली. या बैठकीत चार्ल्स कुरैय्या यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजलीसाठी उभे रहावे असे सांगेपर्यंत मंत्री गावडे यांनी सभागृहातून काढता पाय घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Muder Case: दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा

Drummer William D'souza: प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Budget 2024: पीएम किसानच्या हप्त्यात होणार वाढ? कृषी तज्ञांनी अर्थमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Assagao Demolition: रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजला घर पाडण्याचा कट, पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड

Colva Police: सतावणूक केली, शंभर डॉलरही घेतले; कोलवाच्या 'त्या' PSI विरोधात आणखी एका महिलेची तक्रार

SCROLL FOR NEXT