Kala Academy in Panjim  Dainik Gomantak
गोवा

Kala Academy : कला अकादमीचा वाद चर्चेतून सामंजस्‍याने सुटणे खूप गरजेचे; ‘गोवा कलाकार एकवोट’कडून मंत्र्यांची पाठराखण

Goa Artist Demand : या प्रकरणात अन्य संबंधितांचा राजीनामा मागण्याचे धाडस कुणीच दाखवत नाही. मंत्री गावडे यांना टार्गेट करण्यात येत असून हा शिमगा ताबडतोब बंद करावा, असे नरेश कडकडे म्‍हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, कला अकादमी दुरूस्तीकामास झालेला विरोध आणि होणारे भष्ट्राचाराचे आरोप यासाठी केवळ कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनाच दोषी ठरविणे चुकीचे आहे.

या प्रकारात अन्य राजकीय नेते, विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, असा सूर ‘गोवा कलाकार एकवोट’ या संघटनेतर्फे आयोजित सभेत व्यक्त करण्यात आला.

येथील इन्‍स्‍टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्‍थेच्‍या सभागृहात काल शुक्रवारी झालेल्‍या सभेला शास्त्रीय गायक प्रवीण गावकर, नाट्यकर्मी रवींद्र आमोणकर, माजी मंत्री विनोद पालयेकर, प्रख्यात गायक शौनक अभिषेकी, तियात्रिस्‍त मिनीन द बांदार, नाट्यकलाकार नरेश कडकडे, नम्रता नाईक, देविदास गावकर व इतर कलाकार उपस्थित होते.

देविदास गावकर म्हणाले, कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्यावर होणारी टीका आणि थेट राजीनामा मागण्याचा प्रकार पाहता यामागे मोठे षड्‌यंत्र असल्याचे दिसून येते. कला आणि संस्कृती क्षेत्राशी काहीही देणे-घेणे नसलेले लोकही त्यांच्याविरोधात बोलू लागतात तेव्हा त्यांचा बोलविता धनी वेगळाच असल्याचे दिसते.

दुरुस्‍तीही फार काळ टिकणार नाही

कला अकादमीची वास्तू पूर्णतः पाडून त्याजागी नवा प्रकल्प उभारण्याची योजना होती. परंतु चार्‍ल्‍स कुरैया फाऊंडेशननेच विरोध केल्यामुळे तिच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. खरे तर या वास्तूच्या वयाचा विचार करता सध्याची दुरुस्तीही फार काळ टिकणारी नाही. अशी सूचना गावकर यांनी केली.

यापूर्वी दुरुस्‍तीचा विचार झालाच नव्‍हता

कला अकादमीच्या सुरूवातीपासून आजतागायत अनेक नेते, अधिकारी आले व गेले. परंतु कुणीही तिच्या दुरुस्तीबाबत विचार केला नाही. मंत्री गावडे हे स्वतः एक कलाकार असल्याने त्‍यांनी दुरुस्तीकाम हाती घेतले.

सध्या ते पूर्णत्वासही आले आहे. खरा कलाकार कधीच दुसऱ्या कलाकाराची बदनामी करत नसतो. या प्रकरणात अन्य संबंधितांचा राजीनामा मागण्याचे धाडस कुणीच दाखवत नाही. मंत्री गावडे यांना टार्गेट करण्यात येत असून हा शिमगा ताबडतोब बंद करावा, असे नरेश कडकडे म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

Pandharpur Wari: वारकऱ्यांना सरकारकडून 5 लाखांपर्यंत आर्थिक मदत; प्लास्टिकमुक्त वारीला द्या प्राधान्य- मुख्यमंत्री डॉ. सावंत

PF Withdrawal New Rule: नोकरदारांनो लक्ष द्या! पीएफ खात्यातून ॲडव्हान्स काढण्याचे बदलले नियम; आता किती वेळा काढता येणार पैसे?

SCROLL FOR NEXT