Nilesh Cabral  Dainik Gomantak
गोवा

काकोडा कचरा प्रक्रिया प्रकल्प 10 मे पासून प्रायोगिक तत्वावर सुरु

निलेश काब्राल यांची माहिती; अवेडे कोठमी येथे तळीच्या सौंदर्यीकरण कामास सुरुवात

दैनिक गोमन्तक

केपे : कुडचडे काकोडा नगरपालिकेचा अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. येत्या 10 मे रोजी प्रायोगिक तत्वावर तो सुरु करुन त्याचे 30 मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत रीतसर उद्घाटन करण्याचा विचार असल्याचे मंत्री निलेश काब्राल यांनी स्पष्ट केले आहे. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. अवेडे कोठमी येथे जिल्हा पंचायत फंडातून हाती घेण्यात आलेल्या तळीच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात करताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

कुडचडे काकोडा पालिकेचा कचऱ्याविषयी पूर्ण तोडगा काढण्यात आला आहे. या प्रकल्पात सांगे, काणकोण, धारबंदोडा आणि केपे तालुक्यातील कचरा आणण्यात येणार असून याविषयी सर्व ती काळजी सरकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. काकोडा येथे उभारण्यात आलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्प अत्याधुनिक असून यातून कोणतीही दुर्गंधी पसरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

कुडचडे पाकिकेचा बराच कचरा अनेक वर्षांपासून कुजत पडला होता आणि त्यातून दुर्गंधीही पसरत होती. यावर आम्ही तात्पुरता उपाय न करता पालिकेसाठी फायद्याचा ठरणार प्रकल्प उभारला असून मोठया प्रमाणात कचऱ्यावर याठिकाणी प्रक्रिया होणार असल्याचे त्यांनी सांगितले. काणकोण,केपे,सांगे आणि धारबंदोडा तालुक्यातील पंचायत आणि पालिका क्षेत्रातील कचरा योग्य प्रकारे याठिकाणी आणण्यात येणार असून याविषयी लोकांनी कोणतीही चिंता करू नये असे नीलेश काब्राल यांनी सांगितले आहे.

कुडचडे मतदारसंघातील लोकांसाठी मारक ठरणारे कोणतेच काम मी करणार नसून ज्या प्रकारे तुम्ही माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास ठेवून विजयी केले त्याला मी तडा जाऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT