Kadamba Bus Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus: कदंब वाहतुकीला नवे बळ; सर्व बस सुस्थितीत, 15 दिवसांत नव्या कदंब बसेसचा ताफा गोव्यात; उल्हास तुयेकर यांची माहिती

Kadamba new bus fleet: येत्या १५ दिवसांत नव्या बसांचा ताफा गोव्यात दाखल होणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष उल्हास नाईक तुयेकर यांनी दिली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: कदंब वाहतूक महामंडळाच्या सर्व बस सध्या चांगल्या स्थितीत असून येत्या १५ दिवसांत नव्या बसांचा ताफा गोव्यात दाखल होणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष उल्हास नाईक तुयेकर यांनी दिली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बसमधील गळती, तांत्रिक बिघाड आणि प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारींबाबत बोलताना त्यांनी महामंडळाकडून आवश्यक दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे सांगितले.

बसची नियमित तपासणी केली जात असून बिघाड टाळण्यासाठी देखभाल आणि दुरुस्तीवर विशेष भर देण्यात येत आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या गळती किंवा अन्य तांत्रिक अडचणींवर तातडीने उपाययोजना केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नव्या बस खरेदी प्रक्रियेलाही गती देण्यात आली आहे. नवीन बस दाखल झाल्यानंतर ग्रामीण आणि शहरी भागांतील सेवा अधिक प्रभावीपणे चालविता येतील, तसेच जुन्या बसवरील ताण कमी होऊन प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, असा विश्वास तुयेकर यांनी व्यक्त केला. कदंबच्या बसची रंगरंगोटी, स्वच्छता, तांत्रिक तपासणी आणि दुरुस्तीची कामे सुरू आहेत.

कदंबसमोरील प्रमुख आव्हाने

पावसाळ्यात बसमधील गळतीच्या तक्रारी

जुन्या बसच्या देखभालीचा वाढता खर्च

वारंवार होणारे यांत्रिक बिघाड

ग्रामीण भागातील फेऱ्या नियमित ठेवण्याचे आव्हान

प्रवाशांना अधिक सुरक्षित व आरामदायी सेवा देण्याची गरज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT