Kadamba Smart Card update Dainik Gomantak
गोवा

Kadamba Smart Card: 'कदंब स्मार्ट कार्ड' स्वतःच करा अपडेट! पणजी बसस्थानकावर स्वयंचलित यंत्रणा; 10 टक्के मिळते सवलत

Kadamba Smart Card update 2026: कदंब महामंडळाने काही महिन्यांपासून प्रवाशांसाठी स्मार्ट ट्रान्जिट कार्ड आणि स्मार्ट पासची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी : कदंब महामंडळाने काही महिन्यांपासून प्रवाशांसाठी स्मार्ट ट्रान्जिट कार्ड आणि स्मार्ट पासची सुविधा सुरू करण्यात आली आहे. स्मार्ट कार्डचा वापर केल्यास नागरिकांना तिकिटात १० टक्के सवलत मिळते.

ज्यावेळी या कार्डमध्ये पैसे भरावे लागतात, पासचे पैसे भरावे लागतात त्यावेळी कंडक्टरकडून किंवा काऊंटरवर जाऊन पैसे भरावे लागतात; परंतु पणजी बसस्थानकावर कार्डमध्ये पैसे भरण्यासाठी, अपडेट करण्यासाठी तसेच कार्डमधील शिल्लक रक्कम पाहण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा उभारण्यात आली असून याचा लाभ मोठ्या प्रमाणात प्रवाशांना होत आहे. या यंत्रणेमुळे प्रवशाला पारदर्शकपणे सर्व प्रक्रिया स्वतः करता येते.

दरम्यान, कार्डमध्ये कशाप्रकारे स्वतः पैसे भरावेत व इतर सुविधांबाबत यंत्रणेजवळ माहिती फलक देण्यात आला आहे. त्याच्या साहाय्याने अतिशय सुरळीतपणे कोणीही या यंत्रणेचा वापर करू शकतो. ही यंत्रणा शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन आणि इतर नोकरदार तरुणाईला अतिशय चांगली ठरत आहे. अनेकजण आता याच यंत्रणेचा वापर करून कार्ड अपडेट करणे, पैसे भरणे आदी गोष्टी स्वतःच करत आहेत.

सुविधा आहे कुठे?

ही यंत्रणा पणजी बसस्थानकावर श्री गणपती मंदिराच्या जवळ असलेल्या कदंब चौकशी कक्षासमोर आहे. जरी आज युवक ही सुविधा वापरत असले तरी अनेकांना ही सुविधा स्थानकावर उपलब्ध आहे, याची माहिती नसल्याने आजही काऊंटरवर जाऊन पास अपडेट करतात. या स्वयंचलित यंत्रणेबाबत प्रवाशांना माहिती देणे आणि जागृती करण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GT vs RR IPL 2026 Qualifier 2: गुजरात की राजस्थान? पावसामुळे सामना रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कुणाला? पाहा काय सांगतो IPL चा नियम

Monsoon Update: मान्सून उशिरा येणार, पण गोव्यात मान्सूनपूर्व पावसाची बॅटिंग सुरूच राहणार

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका! 8व्या वेतन आयोगाला उशीर; होणार लाखोंचे नुकसान, 'हे' आहे कारण

Tata Tiago 2026: 6 एअरबॅग्ज अन् 15 वर्षांची बॅटरी गॅरंटी; टाटाने अवघ्या 5 लाखांत आणली मिडिल क्लाससाठी बेस्ट कार, मिळतील 'हे' दमदार फीचर्स

Goa Politics: निवडणुकीत चुचकारायचे, नंतर विसरायचे! गोव्यात गेल्या 40 वर्षांपासून मराठी भाषेबाबत खेळलं जातंय घाणेरडं राजकारण!

SCROLL FOR NEXT