Crime News Dainik Gomantak
गोवा

Kadamba News : ‘कदंब’चे ‘ते’ कर्मचारी रडारवरच; वन खात्याकडून सखोल तपास सुरू

Kadamba News : ज्या ठिकाणी हे कर्मचारी सहलीसाठी गेले होते, त्या घटनास्थळावरून काही रक्ताच्या डागांचे तसेच शिजवलेल्या मांसाचे नमुने घेऊन ते ‘सीएफएसएल’कडे (सेंट्रल फोरेन्सिक सायंटिफिक लॅबोरेटरी) पाठवण्यासाठी आणल्याची माहिती सूत्राने दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Kadamba News :

पणजी, नेत्रावळी अभयारण्यातील साळजिणी येथे शिकारीच्या संशयावरून वन खात्याने अटक केलेल्यांना कदंब महामंडळाच्या व्यवस्थापनाने कारवाईपासून अभय दिले असले, तरी वन खात्याने मात्र गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

ज्या ठिकाणी हे कर्मचारी सहलीसाठी गेले होते, त्या घटनास्थळावरून काही रक्ताच्या डागांचे तसेच शिजवलेल्या मांसाचे नमुने घेऊन ते ‘सीएफएसएल’कडे (सेंट्रल फोरेन्सिक सायंटिफिक लॅबोरेटरी) पाठवण्यासाठी आणल्याची माहिती सूत्राने दिली आहे.

पार्टीच्या नावाखाली कथित शिकारीप्रकरणी गेलेल्या कदंब महामंडळाच्या १६ कर्मचाऱ्यांना वन खात्याने अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव रक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला होता. न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन दिल्यानंतर चौकशीस हजेरी लावण्याची अट घातली होती.

या प्रकारानंतर कदंब महामंडळाने त्यांच्याविरुद्ध कोणतीच कारवाई केलेली नाही, परंतु आता कदंब महामंडळाच्या कारवाईतून सुटलेल्या या कर्मचाऱ्यांविरुद्ध ठोस पुरावे जमा करण्याचे काम वन खात्याने सुरू केले आहे.

आरोपपत्र सादर करणार

बेकायदेशीरपणे हत्यारे घेऊन अभयारण्यात प्रवेश करणे तसेच आग पेटवणे हे गुन्हे प्रथमदर्शनी सिद्ध झालेले आहेत. हे कर्मचारी शिकारीसाठी गेले होते याचे पुरावे हाती आल्यास त्यांच्यासभोवतीची फास अधिक मजबूत होऊन न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात येईल. सध्या ही चौकशी योग्य दिशेने सुरू आहे. कोणत्याही त्रुटी त्यात राहू नयेत याची सावधगिरी बाळगण्यात येत आहे. वन खात्याचे कर्मचारी काहीजण साक्षीदार म्हणून घेण्यात आले आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास

काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांकडे सापडलेली काडतुसे त्याचा बॅलेस्टिक अहवालासाठी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. त्यामुळे या काडतुसांचा वापर करण्यात आला होता का याची माहिती समोर येणार आहे. कायद्यानुसार ही चौकशी करण्यास वेळ आहे व संशयित कदंब कर्मचारीही जामिनावर आहेत. त्यामुळे घाई न करता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे, अशी माहिती वन खात्याच्या चौकशी अधिकाऱ्याने दिली आहे.

वन खात्याकडून पुरावे जमा करण्यास प्रारंभ...

सहलीसाठी जंगलात गेलेल्या कदंब महामंडळाच्या १६ ही कर्मचाऱ्यांच्या जबान्या वन खात्याच्या चौकशी अधिकाऱ्याने नोंदवून घेतल्या आहेत, परंतु जबानीत कोयता व कुऱ्हाड नेण्यामागील स्पष्टीकरण यापैकी कोणीही देऊ शकलेला नाहीत.

त्यामुळे चौकशी अधिकाऱ्यांचा शिकारीसंदर्भातचा संशय अधिक बळावला असून त्यासाठीचे आवश्‍यक असलेले पुरावे जमा करण्यास सुरवात करण्यात आली आहे.

वन खात्याच्या चौकशी अधिकाऱ्याने घटनास्थळी जाऊन तेथील झाडांच्या पानांवर असलेले रक्ताच्या डागांचे नमुने घेतले आहेत.

तसेच काही शिजवलेल्या आणि टाकून देण्यात आलेल्या मांसाचे नमुनेही घेतले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: सायबर क्राईम रोखण्यासाठी गोवा पोलिस अलर्ट, 152 मोबईल नंबर केले ब्लॉक

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

IFFI 2024 मध्ये लोकसंस्कृतीद्वारे देशाची एकता, अखंडतेचे दर्शन! दवर्लीत होणार खुले फिल्म स्क्रिनिंग

Nithya Menen At IFFI: 'तरीही त्या व्यक्तीसोबत काम करणे कर्तव्यच'; अभिनेत्री नित्या मेनन सहकलाकारांबद्दल नेमके काय म्हणाली..

IFFI 2024: ‘ट्रेन’ संकल्पनेतून भारतीय सिनेमाची ‘सफर’! कॅमेऱ्याच्या प्रवेशद्वाराचे विशेष आकर्षण

SCROLL FOR NEXT