पणजी: मी काय मिळवू शकते यापेक्षा मी काय देऊ शकते, हा विचार मी नेहमीच करते. चित्रपटात काय योगदान देऊ शकते, हा एकमेव विचार माझ्या मनात सतत सुरू असतो. कुठलाही चित्रपट करण्याअगोदर दिग्दर्शकाची आवड मी पाहते आणि त्याची इच्छा पाहून मी चित्रपट निवडते, असे अभिनेत्री नित्या मेनन हिने सांगितले.
आपला अभिनय आणि कलाकृतींवरील समर्पणासाठी ओळखली जाणारी नित्या मेनन हिने चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनेक अभिनेत्यांप्रमाणे औपचारिक प्रशिक्षण घेतले नसले तरी नित्याची अभिनय शैली पूर्णपणे सहज आहे.
ती म्हणाली, मी अभिनयाचे शिक्षण घेतलेले नाही. अभिनय मला सहजपणे उमगला असून मी त्याच्याशी चिकटून राहिले. कामाबद्दल जास्त विचार करत नाही. माझे काम फक्त माझ्या डोक्यात सुरू असते.
नित्याने अनेक आव्हानात्मक भूमिका पेलल्या. शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तीची भूमिका साकारण्यावरही तिने भाष्य केले. ती म्हणाली, मी दिग्दर्शकाला कधीही प्रश्न विचारत नाही. माझे काम अधिक समजून घेणे आणि नैसर्गिकरीत्या ते साकारणे याला मी प्राधान्य देते.
नित्या मेनन यांनी सांगितले की, जर मला कधी वाटले की मी एखाद्या व्यक्तीबरोबर काम करू शकत नाही, तर त्या व्यक्तीची ऊर्जा आणि माझी ऊर्जा समान नाही हे समजते. पण तरीही अभिनेत्री म्हणून त्या व्यक्तीसोबत काम करणे आपले कर्तव्य आहे. आपण जेव्हा काम करतो तेव्हा एकमेकांशी जोडले जातो. मी वेगवेगळ्या लोकांसोबत काम केले आहे आणि मला चांगला अनुभव आला आहे.
अभिनेत्यासाठी मौन खूप आवश्यक असते. भावनिक चित्रीकरण असेल तर त्यात भावनांची देवाणघेवाण होते. अशावेळी सेटवर शांतता आवश्यक असते. परंतु बऱ्याच वेळी ती मिळत नाही.
नित्या मेनन, अभिनेत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.