IFFI 2024 Folk Culture Performances Open Film Screening At Davorlim
५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देशातील विविध प्रांतातील लोकसंस्कृतींद्वारे देशाची एकता आणि अखंडतेचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिल्ली येथील सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनतर्फे एनएफडीसीच्या सहकाऱ्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत आयनॉक्ससमोरील ‘रेड कार्पेट’वर गुरुवारी काश्मीरच्या महिला कलाकारांनी संगीताच्या ठेक्यावर लोकसंस्कृतीचे आकर्षक दर्शन घडविले आणि उपस्थित सिनेरसिकांची मने जिंकली.
दिल्ली येथील सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन आणि एनएफडीसीतर्फे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दररोज एका राज्यातील लोककलाकारांतर्फे लोकसंस्कृती दर्शन घडविण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्र, राजस्थान, हिमाचल प्रदेश, काश्मीर आदी राज्यांचा समावेश आहे, अशी माहिती सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनच्या दिल्ली येथील मुख्यालयातील साहाय्यक संचालक गोपा विश्वास यांनी दिली.
सध्या गोव्यात इफ्फीची धूम आहे. यानिमित्त काल दवर्ली गावात लोकांसाठी खुले फिल्म स्क्रिनिंग करण्यात आले. सिनेमा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. गावात फिल्म स्क्रिनिंग ठेवल्याबद्दल दवर्ली-दिकरपाल पंचायतीचे सरपंच साईश राजाध्यक्ष यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानले.
दवर्लीसारख्या गावात इफ्फीचे कार्यक्रम आयोजित करून हे सरकार सामान्यांचे हित पाहत असल्याचे ते म्हणाले. सुरवातीला एक छोटेखानी उद्घाटन सोहळा झाला. यावेळी माजी सरपंच हर्क्युलान नियासो यांचेही भाषण झाले. सोहळ्याला सर्व पंचसदस्य उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.