Kadamba Bus Dainik Gomantak
गोवा

Kadamba Transport: कदंबच्या इलेक्ट्रिक बसचालकांचा संप मागे; 50 चालक कामावर हजर, 90 उद्या हजर होणार

सरव्यवस्थापकांची माहिती

Akshay Nirmale

Kadamba Transport: पगारवाढीच्या मागणीसाठी अचानक संपावर गेलेल्या कदंब महामंडळाच्या इलेक्ट्रिक बस चालकांनी संप मागे घेतला आहे. एकूण 150 चालक सहभागी झाले आहेत. पैकी 50 चालक आज, शनिवारी हजर झाले. तर उद्या रविवारी उर्वरीत 90 चालक हजर होतील, अशी माहिती कदंबचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी दिली आहे.

दरम्यान, कुणीतरी भडकावल्यानेच हा संप झाल्याचा आरोप घाटे यांनी केला आहे. शुक्रवारी हे बसचालक संपावर गेल्यावर कदंब वाहतूक महामंडळाने हा संप बेकायदेशीर ठरवला होता. तसेच संपावरील चालकांवर अत्यावश्यक सेवा (एस्मा) कायद्याखाली कारवाईची तयारी सुरू केली होती.

अकस्मात संपावर जाणे म्हणजे सर्वसामान्यांना वेठीस धरणे आहे. या चालकांचा कदंब महामंडळाशी थेट संबंध नाही. ते खासगी कंपनीसाठी काम करतात, असे कदंबच्या वतीने सांगण्यात आले होते.

कदंब महामंडळाने या 51 बसेस ‘ऑलेक्ट्रा’ या खासगी कंपनीकडून भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतल्या असून त्या बसेसवर हे कंत्राटी चालक आहेत. संपामुळे या 51 बसेस बंद राहिल्या होत्या. या बसचालकांनी पगारवाढीची वाढ व्हावी, अशी मागणी करत दरमहा 25 हजार मानधन हातात मिळावे, अशी मागणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT