Kadamba Electric Bus Dainik Gomantak
गोवा

चार्ज न झालेली कदंब बस सोडल्याने प्रवासी अर्ध्या रस्त्यात अडकले

कदंब बसी रस्त्यावरच नादुरुस्त होण्याच्या प्रकरणात वाढ

दैनिक गोमन्तक

मडगाव : कदंबच्या बसेसमागचं शुक्लकाष्ठ काहीकेल्या संपताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी फोंडा येथे डिझेल न भरलेली बस सोडल्याने प्रवाशांचे हाल झाले होते. दोनच दिवसापूर्वीच अशीच घटना कुडचडे येथे घडली आणि काल परत गुरुवारी 19 मे 2022 रोजी मडगाव-पणजी मार्गावरील शटल इलेक्ट्रिक बस चार्ज नसल्यामुळे ड्रायव्हरने नुवे बायपास रस्त्यावर बंद केली. त्यामुळे पुन्हा एकदा कदंबच्या प्रवाशांचे हाल झाले.

बस चार्ज नसल्यामुळे दुसरी बस आणून प्रवाशांना पणजीला पाठवण्यात आले. मात्र तोपर्यंत प्रवाशांचा अर्धा ते पाऊण तास वाया गेला. त्यातच पावसाची रिपरिप सुरु असल्याने प्रवाशांचे आणखी हाल झाले. ही बस ( GA08U5704) सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास सोडण्यात आली होती. पण 10.30 वाजता ड्रायव्हरने नुवे इथे बायपासवर बस चार्ज नसल्याचं कारण देत पुढे न जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान यासंबंधी प्रवाशांनी कदंबच्या ड्रायव्हरला विचारणा केली असता त्याने अधिकाऱ्याने ही बस आपणास नेण्यास सांगितल्याचं उत्तर दिलं. तसंच चार्ज आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी आपली नाही असं उर्मट उत्तरही त्याने प्रवाशांना दिलं. चिडलेल्या एका प्रवाशाने थेट मडगाव कदंब बस डेपोमध्ये संपर्क साधला. तेव्हा डेपो व्यवस्थापकाने सांगितले की वीज प्रवाह सुरळीत नसल्यामुळे किंवा विजेचा दाब कमी असल्यामुळे कदाचित बस 100 टक्के चार्ज झाली नसावी. नुकत्याच महामंडळाने 15 नवीन इलेक्ट्रिक बस घेतलेल्या आहेत. ड्रायव्हर नसल्यामुळे या बस डेपोमध्ये ठेवण्याची नामुष्की कदंब प्रशासनावर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

SCROLL FOR NEXT