panjim bus stand accident Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus Accident: इलेक्ट्रिक कदंब झाली ब्रेकडाऊन, पार्क केलेल्या गाड्यांना दिली धडक; ब्रेक फेल झाल्याचा चालकाचा दावा

kadamba electric bus breakdown: बसस्थानकातून बाहेर निघत असतानाच अनियंत्रित होऊन पार्क केलेल्या अनेक वाहनांना धडकली

Akshata Chhatre

पणजी: कदंब परिवहन महामंडळाची एक इलेक्ट्रिक बस सोमवारी (दि.८) दुपारी पणजी बसस्थानकातून बाहेर निघत असतानाच अनियंत्रित होऊन पार्क केलेल्या अनेक वाहनांना धडकली. या घटनेमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ब्रेक फेल झाल्याने अपघात?

चालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कदंबची इलेक्ट्रिक सिटी बस बसस्थानकामधून प्रवाशांना घेऊन जात असताना अचानक चालकाला वाहनावरील ब्रेकचा वापर करता येईनासा झाला, त्याचा ताबा सुटला आणि बस अनियंत्रित होऊन थेट रांगेत उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर आदळली. या अपघातात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

बसचालकाने दिलेल्या माहितीनुसार, ही बस पणजी बस स्थानकावरून शहरात जात असतानाच काही सेकंदात ही घटना घडली. बसचे ब्रेक अचानक निकामी झाले, ज्यामुळे हा अपघात घडला.

ब्रेक निकामी होण्याचे कारण काय?

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि कदंब महामंडळाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून, चालकाच्या दाव्याची सत्यता पडताळणी करत आहेत. बसच्या ब्रेक निकामी होण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT