Goa Kadamba Bus Dainik Gomanatak
गोवा

कदंब महामंडळाचे दररोज 20 लाखांचे नुकसान

गोव्यात वेगवेगळ्या मार्गांवर 117 बसेस धावत आहेत

दैनिक गोमन्तक

पणजी: दरवर्षी 120 कोटी रुपयांचे सरकारी अनुदान घेणारे कदंब परिवहन महामंडळ (Kadamba Transport Corporation) अनेक कारणांमुळे नुकसानीत चालले आहे. त्यातच कोरोना महामारीमुळे (Covid-19) राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे (Curfew) कदंब महामंडळाच्या 417 बसेस बंद ठेवाव्या लागल्या होत्या. त्यामुळे कदंब महामंडळाचे (Goa Kadamba Bus)दररोज 20 लाख रुपयांचे नुकसान होत होते. मात्र, आता या स्थितीत सुधारणा झाली असून राज्यात वेगवेगळ्या मार्गांवर सध्या 117 बसेस धावत आहेत.

आता राज्यात कोरोनामुळे संचारबंदी असली तरी 50 टक्के कदंबच्या बसेस सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे प्रवासीच नसल्यामुळे सध्या कदंबच्या फक्त 117 बसेस विविध मार्गांवर सुरू होत्या. त्यात आता तीन आंतरराज्य मार्गावरील बसेसची भर पडली आहे.

बुधवारपासून मुंबई, पुणे आणि बंगळुरू या तिन्ही महामार्गांवर दररोज सायंकाळी पणजी कदंब बसस्थानकातून प्रत्येकी एक बस सुटणार आहे. ती बस सकाळी ठरावीक स्थानावर पोहोचेल. त्यानंतर तीच बस सायंकाळी त्या ठिकाणाहून सुटून दुसऱ्या दिवशी पणजीत दाखल होईल. अशाप्रकारे या बसेसचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

मुंबई, पुणे, बंगळुरू मार्गावर आंतरराज्य सेवा

कोविड महामारीमुळे बंद असलेली गोवा कदंब महामंडळाची आंतरराज्य मार्गावरील बस सेवा काही काळ बंद होती. आता ही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे. याअंतर्गत आज बुधवारपासून मुंबई, पुणे आणि बंगळुरू या तीन महामार्गांवरील कदंब बसच्या फेऱ्या वाढणार आहेत. मात्र, या बसमध्ये कोविड लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी दिली. या बससेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांकडून कसा प्रतिसाद मिळतो, यावरून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT