गोव्याची फेणी ‘गल्ला’ जमवण्‍यात कमी!

गोवा सरकारचीही चिंता वाढली, फेणीचा जागतिक प्रसार होणे गरजेचे
Goa Feni
Goa FeniDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यातील (Goa) काजू फेणीला (Feni) यापूर्वीच भौगोलिक अधिष्ठान (GI Norm) मिळाले आहे. त्याशिवाय राज्य सरकारने (Goa Government) फेणीला वारसा पेयाचा दर्जा दिल्याने तिची निर्यात करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. जरी असे असले तरी गोव्यातील या पारंपरिक पेयातून अजून उत्पादकांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचेच दिसून येत आहे. त्‍यामुळे हे पेय विदेशात कसे लोकप्रिय करावे यावर राज्यात विचार सुरू झाला आहे.

राज्य सरकारने तयार केलेले काजू फेणी उत्पादन धोरण हे त्यादृष्टीने पाहिले पाऊल मानले जात आहे. गोव्याची काजू फेणी ही तशी प्रसिद्ध असली तरी तिचा दर्जा राखण्यास उत्पादक कमी पडत आहेत. त्‍यामुळेच तिला जागतिक बाजारात फार मोठी मागणी नसल्याचे दिसून आले आहे. आता सरकारने दर्जा नियंत्रक यंत्रणा सज्ज करावी अशी मागणी केली जात आहे. या फेणीतून राज्याला अजून अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. आता राज्य सरकारने आपले धोरण तयार केल्याने फेणीचा जागतिक प्रसार करण्याच्या दृष्टीने आम्ही पावले टाकू शकू, अशी प्रतिक्रिया फेणीचे प्रमुख उत्पादक असलेले हेंझल वाझ यांनी व्यक्त केली.

Goa Feni
हाच का ‘विकास’? आठ महिन्‍यांत गॅस सिलिंडरच्या दरात 190 रुपयांची वाढ

गोव्याच्या फेणीला 2013 साली जीआय नॉर्म मिळाला. 2016 साली तिला राज्य सरकारने वारसा पेयाचा दर्जा दिल्याने ‘गावठी दारू’ हा तिच्या माथी मारलेला शिक्काही दूर झाला. असे जरी असले तरी त्याचा फार मोठा फायदा राज्याला झालेला नाही. याबद्दल बोलताना वाझ म्हणाले की, जीआय नॉर्मचे फायदे काय याची जाणीव स्थानिक उत्पादकांना व्हावी यासाठी राज्य सरकारने जीआय महोत्सव आयोजित करावेत, जेणेकरून उत्पादकांना आपण कोणत्या दर्जाची फेणी तयार करण्याची गरज आहे हे समजेल.

काजू फेणीला अपेक्षित प्रतिसाद न मिळण्याचे प्रमुख कारण म्‍हणजे कित्येक उत्पादक अल्‍प फायद्यासाठी तिच्‍या दर्जाशी तडजोड करतात. त्यामुळे कमी दर्जाचा माल बाजारात येतो. उत्पादकांनी हे बंद केल्यास फेणीला चांगले दिवस निश्चित येतील. तसेच सरकारनेही फेणीच्‍या प्रसारासाठी पावले उचलली पाहिजेत.

- गुरुदत्त भक्ता, फेणी उत्पादक संघटनेचे अध्यक्ष

Goa Feni
अतिउत्‍साह नडला! मोरजी समुद्रात कार चालविण्‍याचा थरार!

अशी बनवली जाते काजू फेणी

फेणी म्हणजे आंबवलेल्या काजूपासून तयार केलेली दारू. गोव्यात काजू लागवडीत वाढ झाल्यानंतर काजूपासून फेणी बनवण्यामध्येही वाढ झाली. स्थानिकांनाही फेणीची चव आवडली आणि तिने हळूहळू इतर मद्यांची जागा घेतली. संस्कृतमधल्या ‘फेना’ शब्दावरून ‘फेणी’ हा शब्द प्रचलित झाला. फेना म्हणजे फेस. काजूची दारू बाटलीतून ग्लासात ओतल्यावर फेस येतो. त्‍यामुळे तिला ‘काजू फेणी’ नाव पडले असे सांगितले जाते. फेणी तयार करण्याची पद्धत क्लिष्ट आहे. पूर्वी काजू तोडल्यावर त्यातले बी काढले जायचे आणि आणि नंतर एका सगळी फळे कुटून त्यातील रस काढला जायचा. अलीकडच्‍या काळात हे काम यंत्राच्‍या साहाय्‍याने केले जाते. हा रस ‘निरो’ नावाने ओळखला जातो. नंतर हा निरो कोडेम नावाच्या मोठ्या मडक्यात आंबवण्यासाठी ठेवला जातो. तीन-चार दिवसांनंतर या रसावरील फेस दिसायचा बंद झाल्यास तो आंबल्याचे मानले जाते. पुढच्या टप्प्यात डिस्टिलेशन प्रक्रियेने शुद्ध फेणी काढली जाते.

"काजू फेणीची बाजारपेठ वाढवायची असेल तर तिचा सर्वदूर प्रसार करण्याची गरज आहे. राज्य सरकारने त्यासाठी फेणी महोत्सवांचे आयोजन केले पाहिजे. शिवाय उत्पादकांनी दर्जेदार माल तयार करावा यासाठी उत्तेजन देण्याची गरज आहे. गोव्यात काजूची लागवड वाढविण्यावरही भर देण्याची गरज आहे."

- हेंझल वाझ, फेणीचे प्रमुख उत्पादक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com