KTCL Recruitment Row Dainik Gomantak
गोवा

KTCL Recruitment Row: कदंब महामंडळाच्या मेगा भरतीला लागणार ब्रेक? कामगार आयुक्तांसमोरील 'ती' बैठक ठरली फोल; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Kadamba Recruitment Controversy: कदंब वाहतूक महामंडळाने २० जून रोजी २०० वाहक आणि १०० अवजड वाहनचालकपदांसाठी तात्पुरत्या व कंत्राटी तत्त्वावरील भरतीची जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: कदंब वाहतूक महामंडळाने २० जून रोजी २०० वाहक आणि १०० अवजड वाहनचालकपदांसाठी तात्पुरत्या व कंत्राटी तत्त्वावरील भरतीची जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीला कामगार संघटनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. रिक्त कायमस्वरूपी पदे न भरता कंत्राटी भरती करण्याचा निर्णय हा निवडणूकपूर्व दिखावा असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, सध्या कदंबमध्ये ३०० हून अधिक चालक व वाहक दैनंदिन वेतन तत्त्वावर कार्यरत आहेत. व्यवस्थापनाने १६ मार्च २०२५ रोजी झालेल्या लेखी करारानुसार त्यांच्या सेवांचे नियमितीकरण करून त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.

व्यवस्थापनाने १९ मार्च २०२५ रोजी झालेल्या करारातील ‘तात्पुरता दर्जा प्रदान करणे’ या महत्त्वाच्या अटीचे उल्लंघन केल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. ही बाब ५ जून २०२६ रोजी कामगार आयुक्तांसमोर झालेल्या बैठकीच्या नोंदीतही नमूद करण्यात आली होती. तरीदेखील व्यवस्थापनाकडून कराराची अंमलबजावणी होत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

पाच वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या बदली चालक व वाहकांना तात्पुरता दर्जा देण्यात आलेला नसताना नव्याने ३०० कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती सुरू करण्यात आल्याबद्दल संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. नव्या भरतीतील उमेदवारांना केवळ एका वर्षासाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केले जाणार असून त्यांना भविष्यात कायमस्वरूपी पदांवर दावा करता येणार नसल्याची अटही अन्यायकारक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

कामगार संघटनेच्या मागण्या

तात्काळ ही भरती प्रक्रिया थांबवून चालक व वाहकांची भरती केवळ कायमस्वरूपी रिक्त पदांसाठीच करण्यात यावी

सलग पाच वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सर्व तात्पुरत्या व बदली चालक-वाहकांचे त्वरित सेवानियमितीकरण करून त्यांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी, भत्ते व इतर सेवा लाभ देण्यात यावेत.

अन्यायकारक कामगार पद्धती

कायमस्वरूपी स्वरूपाची कामे कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करून घेणे आणि त्यांना अनेक वर्षे सेवेत ठेवूनही नियमित न करणे ही अन्यायकारक कामगार पद्धती असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT