Kadamba Electric Bus Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus Service : मोपा-मडगाव कदंब बसचे दर थोडे महागच

कदंब बससेवेचे दर महाग असल्याचे कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी मान्य केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मोपा विमानतळ सुरू झाला असून प्रवाशांना वाहतुकीचा आणखी एक पर्याय म्हणून सरकारने कदंब महामंडळ बससेवा सुरू केली आहे, परंतु ही सेवादेखील महाग असून मोपा - मडगाव जाण्यासाठी दर 500 रुपये, पणजी 250 रुपये आणि म्हापसा 200 रुपये ठेवले आहेत. कदंब बससेवेचे दर महाग असल्याचे कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी मान्य केले आहे.

सध्या मोपा - मडगाव मार्गावरील दर 100 रुपये कपात करून 400 रुपये केला आहे. येणाऱ्या दिवसांत दर बदलण्यासंदर्भात विचार केला जाईल, असे तुयेकर यांनी स्पष्ट केले. पर्वरी येथे विधानसभा संकुलात ते पत्रकारांशी बोलत होते.

मोपा विमानतळ नव्याने सुरू झाला असून सुरुवातीला अभ्यास करण्यासाठी दर निश्‍चित केला आहे. कारण बसमध्ये किती प्रवासी येणार हे सांगता येणार नाही. बसची क्षमता 40 हून अधिक आहे. त्यात चार ते पाच प्रवासी आल्यास महामंडळाला फटका बसणार आहे. त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळाल्यास दरांसंदर्भात नक्की विचार केला जाईल, असे तुयेकर यांनी सांगितले.

मोपातून थेट सासष्टीला जाण्यासाठी टॅक्सी शुल्क जास्त असल्याने कदंब महामंडळाची बस घेऊन प्रवास करण्याची सुविधा आहे, परंतु कदंब महामंडळाने दर जास्त ठेवल्याने प्रवाशांचा अपेक्षाभंग झाला आहे. पणजी ते मडगाव शटल बससेवा दर 50 रुपये असून मोपा ते मडगाव थोडा जास्त दर अपेक्षित होती. मात्र खूपच महाग ठेवल्याने जनतेकडून टीका होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT