Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: मोपा विमानतळासाठी ‘कदंब’ची बससेवा उद्यापासून

प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्था करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवार, 5 जानेवारीपासून कार्यरत होणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्था करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून विमानतळावर कदंब महामंडळाची बससेवा सुरू होणार आहे.

‘कदंब’च्या 6 इलेक्ट्रिक बसेस सेवेत असणार आहेत. मोपा - पणजी - मडगाव, मोपा - म्हापसा - कळंगुट, मोपा - म्‍हापसा - पणजी या मार्गांवर बसेस सेवा देणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे महाव्यवस्थापक संजय घाटे यांनी दिली.

पर्वरी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मोपा-मडगाव रूटसाठी 500 रुपये शुल्क असेल, तर मोपा-पणजी 250, मोपा-कळंगुट 250, मोपा-म्हापसा 200 असे शुल्क निश्‍चित केले आहे. प्रारंभी हेच दर असतील. मात्र, नंतर आवश्‍यकतेनुसार ते बदलण्यात येतील. सकाळी 10 वाजता मोपावर पहिली बस पोहोचेल.

मध्यरात्री 1 वा. शेवटची बस मडगाव मार्गावर असेल. कोणत्याही वेळेला विमानतळावर पोहोचणाऱ्यांना बस उपलब्ध असेल, याची खात्री महामंडळाने केली आहे, असे घाटे यांनी स्पष्ट केले.

‘कदंब’चेही ॲप

आता कदंबच्या बसेसचे बुक माय ट्रीप, रेड बस आणि गोवा माईल्स ॲपद्वारे बुकिंग करता येईल. मोपासाठी 9 मीटर लांबीच्या बसेस मागवल्या आहेत. सध्या 49 प्रवाशांची क्षमता असलेल्या 12 मीटर लांबीच्या बसेस वापरल्या जातील.

‘कदंब’च्या सर्व बस सेवेसाठी पेटीएम कंपनी ॲप तयार करत आहे. आंतरराज्य आणि राज्य बसेस कुठल्या मार्गावर कुठे आहेत, याची माहिती या ॲपवर मिळेल, असे घाटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT